Mohammad Kaif Virat Kohli viral post Dainik Gomantak
क्रीडा

Viral Post: 'Imagine after two ducks... विराट कोहली संपला...,' RCBच्या विजयानंतर मोहम्मद कैफची 'ती' पोस्ट तुफान व्हायरल

Mohammad Kaif Virat Kohli viral post: आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवला.

Sameer Amunekar

बेंगळुरू: आयपीएल २०२६ च्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे 'किंग' विराट कोहली. विराटने १८१.५८ च्या स्ट्राईक रेटने ३८ चेंडूंत नाबाद ६९ धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी जल्लोष केलाच, पण टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विराटाच्या वाढत्या वयावर आणि फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या टीकाकारांना कैफने या पोस्टद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दोनवेळा शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहलीचे करिअर संपले, अशी टीका काही स्तरांतून होत होती. याच टीकेचा समाचार घेताना मोहम्मद कैफने लिहिले की, "काही लोक म्हणत होते की विराट कोहली संपला आहे. पण पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील (White Ball Cricket) त्याचे शेवटचे १० स्कोअर पाहा: ७४, १३५, १०२, ६५, १३१, ७७, ९३, २३, १२४ आणि कालचे नाबाद ६९ धावा." कैफच्या या पोस्टमुळे विराटच्या टीकाकारांना आता उत्तर देणे कठीण झाले असून, सोशल मीडियावर ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरत आहे.

आयपीएलच्या इतिहासात रचणार नवा विक्रम?

विराट कोहली हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आतापर्यंत ८ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो एकमेव फलंदाज असून, चालू हंगामातील त्याची लय पाहता, ९ हजार धावांचा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विराटने ५ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार खेचत आपल्या बॅटमध्ये अजूनही किती धार बाकी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दिले आहे.

आरसीबीची पुढची लढत 'चेन्नई' विरुद्ध

पहिल्या सामन्यातील दिमाखदार विजयानंतर आरसीबीचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता सर्वांच्या नजरा ५ एप्रिल रोजी होणाऱ्या हायव्होल्टेज लढतीकडे लागल्या आहेत. ५ एप्रिल रोजी आरसीबीचा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध होणार आहे. या सामन्यातही विराट कोहली आपला हाच फॉर्म कायम राखणार का, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT