Mitchell Johnson | David Warner
Mitchell Johnson | David Warner ICC
क्रीडा

Mitchell Johnson: 'त्याचा मेसेज आलेला, ज्यात...', जॉन्सनने सांगितले का केली वॉर्नरच्या निवृत्तीवर जहरी टीका

Pranali Kodre

Mitchell Johnson revealed he had received message from David Warner that led him to writing column:

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्ध मायदेशात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या कारकिर्दीतील अखेरची कसोटी मालिका आहे. मात्र, त्याची या मालिकेसाठी निवड झाल्यानंतर वॉर्नरचा माजी संघसहकारी मिचेल जॉन्सनने त्याच्यावर जोरदार टीका केली होती.

जॉन्सनने द वेस्ट ऑस्ट्रेलियनसाठी लिहिलेल्या आर्टिकलमध्ये २०१८ साली झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणात वॉर्नरचा असलेला सलावेशाबद्दल आठवण करून देत म्हटले होते की वॉर्नर हिरोसारख्या निरोपाला पात्र नाही. तो गेल्या काही वर्षांपासून कसोटीत फलंदाजी करताना संघर्ष करत असताना त्याला फार महत्त्व दिले गेले.

याशिवाय त्याने ऑस्ट्रेलिया संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष जॉर्ज बेलीवरही टीका केली होती.

आता ही टीका का केली होती, याबाबत जॉन्सनने खुलासा केला आहे. जॉन्सनने वॉर्नरवर टीका केल्यानंतर अनेकांनी त्याला फटकारले होते. पण आता यामागील कारण जॉन्सननेच स्पष्ट केले आहे.

जॉन्सनने सांगितले की या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा वॉर्नरची पत्नी कँडिस हिने वॉर्नरला संघात जागा मिळण्याबद्दल समर्थन केले होते, त्यावर त्याने आर्टिकल लिहिले होते, ज्यानंतर वॉर्नरने त्याला एक मेसेज केला होता.

त्या मेसेजमध्ये काही वैयक्तिक गोष्टी लिहिलेल्या होत्या. जॉन्सनने मान्य केले की वॉर्नरवर टीका करणारे आर्टिकल लिहिण्यामागे चेंडू छेडछाड प्रकरणाव्यतिरिक्त त्याचा मेसेज हे एक कारण होते.

आता याबद्दल जॉन्सनने त्याच्या 'द मिचेल जॉन्सन क्रिकेट शो' या पॉडकास्टमध्ये सांगितले की 'मला डेव्हिडकडून एक मेसेज आला होता, जो खूप वैयक्तिक होता. मी त्याला कॉल करून त्याच्याशी त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला, ज्यासाठी मी नेहमीच तयार असतो.'

'जेव्हा मी खेळणे थांबवले, तेव्हापासून मी खेळाडूंशी सर्व खुलेपणाने बोलत असतो. मी त्यांना सांगितले आहे की जर मी मीडियात आहे आणि तुम्हाला न आवडलेल्या गोष्टी मी लिहिल्या, तर माझ्याकडे येऊन माझ्याशी बोला.'

जॉन्सन पुढे म्हणाला, 'तोपर्यंत ती गोष्ट वैयक्तिक नव्हती. कदाचीत ते एक कारण होते की मी हे आर्टिकल लिहिले. नक्कीच तो त्याचा एक भाग होता. त्या मेसेजमध्ये अशा गोष्टी होत्या, ज्याबद्दल मी सांगणार नाही.'

'मला वाटते की डेव्हिडवर आहे की त्याला याबद्दल बोलायचे आहे की नाही. त्यात अशा काही गोष्टी होत्या, ज्या नक्कीच निराशाजनक होत्या. खरं सांगायचं झालं, तर त्याने जे काही म्हटले होते, ते नक्कीच खूप वाईट होते.'

याशिवाय जॉन्सनने केलेल्या टीकेवर जॉर्ज बेलीने म्हटले होते की 'मला आशा आहे की तो बरा आहे.' यावरही जॉन्सनने राग व्यक्त केला आहे. त्याने त्याचा संबंध मानसिक आरोग्याशी जोडताना बेलीवर निराशा व्यक्त केली.

जॉन्सन म्हणाला, 'मला मानसिक समस्या होत्या म्हणून मी बरा आहे का विचारणे, हे माझ्या आर्टिकलचा अपमान करण्यासारखे आहे. तसेच मानसिक आरोग्याशी त्याला जोडणे, खूपच निराशाजनक आहे.

'कोणाच्याही मानसिक आरोग्यावर टीका करणे आणि मी कशातून तरी जात आहे, मी जे म्हटले आहे, ते मला काहीतरी मानसिक समस्या आहे म्हणून म्हटले, असा विचार करणे वाईट आहे. ते खरे नाही. मी त्याच्या विरुद्ध आहे. मी खूप स्पष्ट मत असलेला व्यक्ती आहे.'

दरम्यान, अद्यापतरी या प्रकरणावर वॉर्नरने भाष्य केलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa Today News Live: 'गोवा फॉरवर्ड'चा बुधवारी डिचोलीत जनता दरबार..!

Stray Dogs In Goa: भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले; किनारे बनले असुरक्षित

Shiroda News: शिरोड्यात खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा

Cape News: सांडपाण्याची डबकी, सोकपिट भरले, झाडेझुडपे वाढली; केपे बाजार दुर्गंधीमय

SCROLL FOR NEXT