David Warner: 'वॉर्नरमुळे देशाचा अपमान, त्याला हिरोसारखा निरोप का?', माजी टीममेटकडूनच जहरी टीका

Mitchell Johnson: वॉर्नर पाकिस्तानविरुद्ध कारकिर्दीतील अखेरची कसोटी मालिका खेळणार आहे, पण त्याच्याआधी ऑस्ट्रेलियाच्याच दिग्गज खेळाडूने चेंडू छेडछाड प्रकरणाची आठवण करून देत कडाडून टीका केली आहे.
David Warner
David WarnerDainik Gomantak
Published on
Updated on

Mitchell Johnson targeted former teammates David Warner :

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्ध मायदेशात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आह. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात अनुभवी डेव्हिड वॉर्नरचीही निवड झाली आहे. दरम्यान, ही मालिका वॉर्नरच्या कारकिर्दीतील अखेरची कसोटी मालिका आहे.

मात्र ही गोष्ट वॉर्नरचा माजी संघसहकारी मिचेल जॉन्सनला वॉर्नरची झालेली निवड आवडलेली नाही. माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्याने म्हटले आहे की तो विशेष निरोप देण्यासाठी पात्र नाही, कारण तो सँडपेपर प्रकरणात अडकला होता.

David Warner
David Warner on Retirement: वॉर्नरने निवृत्तीबद्दल केली मोठी घोषणा! 'ही' कसोटी मॅच ठरणार शेवटची

द वेस्ट ऑस्ट्रेलियनच्या कॉलममध्ये जॉन्सनने लिहिले आहे की 'पाच वर्षे होऊन गेली आहेत आणि डेव्हिड वॉर्नरने अजूनही चेंडू छेडछाड प्रकरणाची जबाबदारी घेतलेली नाही. आता तो ज्याप्रकारे बाहेर जात आहे, त्यातून आणखीनच अंहाकार आणि देशाचा अनादर दिसतो.'

'वॉर्नरसाठी चाहते काय घेऊन येतील, सँडपेपरही कमी पडेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीतील यशापुरते मर्यादीत नाही. तुम्ही स्वत:ला कसे सांभाळले, कसा खेळ केला, हे तुम्ही गेल्यानंतरही बराच काळ लक्षात राहाते.'

'आपण डेव्हिड वॉर्नरसाठी निरोपाची तयारी का करत आहोत, कोणी मला यामागचे कारण सांगू शकेल का? एक संघर्ष करणारा सलामीवीर त्याच्या निवृत्तीची तारीख कशी घोषित करू शकतो? आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या इतिहासातील एका मोठ्या घोटाळ्यातील प्रमुख असलेला खेळाडूला हिरोसारखा निरोप का मिळावा?'

'वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार कधीही नव्हता आणि त्यासाठी कधीही पात्रही नव्हता. तो त्याची कारकिर्द कर्णधारपदासाठी आजीवन बंदीसह संपवत आहे.'

David Warner
David Warner: 100 व्या कसोटी द्विशतक करताच वॉर्नर का गेला मैदानाबाहेर? पाहा Video

2018 साली मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघात केपटाऊन कसोटी सामना झाला होता, त्यावेळी कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, स्टीव्ह स्मिख आणि डेव्हिड वॉर्नर चेंडू छेडछाड प्रकरणात अडकले होते.

बॅनक्रॉफ्टकडे चेंडूशी छेडछाड करण्यासाठी वापरण्यात आलेला सँडपेपर सापला होता. त्यावेळी स्मिथ ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार होता, तर वॉर्नर उपकर्णधार होता. यामागे वॉर्नरची कल्पना असल्याचे म्हटले गेले होते.

या प्रकरणानंतर बॅनक्रॉफ्टला ९ महिन्यांसाठी आणि वॉर्नर व स्मिथला एक वर्षांसाठी क्रिकेट खेळण्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी घातली होती. तसेच बॅनक्रॉफ्ट आणि स्मिथवर नेतृत्वासाठी दोन वर्षांची बंदी घातली होती, तर वॉर्नरवर नेतृत्वासाठी आजीवन बंदी घालण्यात आली होती. पण दिलेली शिक्षा भोगून या तिन्ही क्रिकेटपटूंनी यशस्वी पुनरागमन केले.

जॉन्सनने पुढे म्हटले, 'नक्कीच अनेकांच्या मते त्याचा एकूण रेकॉर्ड पाहाता, तो एक दिग्गज सलामीवीरांपैकी एक आहे, पण गेल्या तीन वर्षांत त्याची कसोटीतील कामगिरी चांगली राहिली नाही. त्याची जितकी सरासरी राहिली, त्याने खालच्या फळीतील कोणताही फलंदाज आनंदी राहिल.'

याशिवाय जॉन्सन म्हणाला, 'दक्षिण आफ्रिकेतील चेंडू छेडछाड प्रकरण अनेकजण विसरू शकत नाही. जरी सँडपेपर गेटमध्ये वॉर्नर एकटा नसला, तरी तो त्यावेळी संघातील सिनियर खेळाडू होता आणि त्यावेळी संघातील असा एक खेळाडू होता, ज्याला लीडर म्हणून आपली शक्ती वापरायला आवडत होती.'

David Warner
IND vs AUS: डावखुरा वॉर्नर अचानक करू लागला उजव्या हाताने बॅटिंग, नक्की काय झालं वाचा

याशिवाय जॉन्सनने ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचा प्रमुख जॉर्ज बेलीवरही टीका केली. त्याने वॉर्नरला संघात संधी देण्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

वॉर्नरने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 109 कसोटी सामने खेळले असून 44.43 च्या सरासरीने 8487 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 25 शतकांचा आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच त्याने चेंडू छेडछाड प्रकरणानंतर पुनरागमन केल्यावर 35 कसोटी सामने खेळले असून 36 च्या सरासरीने 2124 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतकांचा आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com