Joe Root X
क्रीडा

IND vs ENG: रुटची विकेट वादाच्या भोवऱ्यात! माजी इंग्लंड कर्णधाराने DRS वर व्यक्त केला राग, नंतर पोस्ट केली डिलीट

Joe Root wicket: जो रुटच्या विकेटबाबत डीआरएसमध्ये दिलेल्या निर्णयावर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

Pranali Kodre

Michael Vaughan questions Hawkeye technology after Joe Root controversial Wicket

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या रांचीमध्ये कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने चौथ्या दिवशी भारतीय फिरकीपटूंचे वर्चस्व राहिले.

दरम्यान, या सामन्यात अनेकदा डीआरएस देखील घेण्यात आला. त्यामुळे त्याबाबत बरीच चर्चा होत आहे. त्यातच जो रुटच्या विकेटवर आता प्रश्न उभे राहत आहेत.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने देखील याबद्दल आपले मत सोशल मीडियावर व्यक्त केले.

डीआरएसबाबत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे ज्यावेळी पायचीतचा निर्णय देण्यात येत असतो, तेव्हा बॉल ट्रॅकिंगसाठी हॉक-आय तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यातून तीन झोनमध्ये बॉल ट्रॅकिंग पाहिले जाते. यामध्ये चेंडूचा टप्पा आणि दिशाही महत्त्वाची ठरते.

दरम्यान, रांची कसोटीत झाले असे की इंग्लंडच्या दुसऱ्या डावात पहिल्या दोन विकेट्स झटपट गेल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव जो रुट आणि सलामीवीर झॅक क्रावली सांभाळत होते. रुटने पहिल्या डावात 122 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यामुळे या डावातही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या.

परंतु, 17 व्या षटकात आर अश्विनने टाकलेला शेवटचा चेंडू रुटच्या पॅडला लागला. त्यावर भारताने केलेल्या पायचीतच्या अपीलवर पंचांनी रुटला नाबाद दिले होते. पण भारताने डीआरएस रिव्हूयू घेतला. डीआरएसमध्ये रुट बाद असल्याचे दिसले. त्यामुळे पंचांना आपला निर्णय बदलून रुटला बाद घोषित करावे लागले.

यानंतर वॉन यांनी ट्वीट करत हॉक-आय तंत्रज्ञानावर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की 'तंत्रज्ञानाने चकीत केले. चेंडूचा अर्ध्यापेक्षा अधिक भाग हा लेग स्टंपच्या बाहेर होता, तरी लाल लाईट दाखवण्यात आली.

'हॉक-आय या मालिकेत साधारण काम करत आहे. यावेळी इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाज रुटच्या विरोधात हा निर्णय गेला.' दरम्यान, ही पोस्ट वॉनने नंतर डिलीट केली.'

परंतु वॉनने पुन्हा एक पोस्ट करत त्यात लिहिले की 'रुटच्या विकेटचे रिप्ले खूप वेळा आपल्याला पाहायला मिळाले नाही, हे चकीत करणारे आहे. डावातील तो महत्त्वाचा क्षण होता.'

तसेच वॉनने आणखी एक पोस्ट करत रुटच्या डीआरएसचा फोटो शेअर करत लिहिले की तुम्हीच ठरवा.

दरम्यान, रुट बाद झाल्यानंतरही इंग्लंडने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव 53.5 षटकात अवघ्या 145 धावांवर संपला. पण पहिल्या डावात घेतलेल्या 46 धावांच्या आघाडीमुळे इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 192 धावांचे आव्हान ठेवले आहे.

भारताने तिसऱ्या दिवस अखेर दुसऱ्या डावात 8 षटकात बिनबाद 40 धावा केल्या आहेत. अद्याप भारताला विजयासाठी 152 धावांची गरज आहे, तर इंग्लंडला 10 विकेट्सची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik: 'ती स्वत:ला वाचवण्यासाठी दुसऱ्यांची नावे घेतेय'; पूजा नाईक प्रकरणात मंत्री ढवळीकर यांचं मोठं विधान

Donald Trump: टॅरिफमुळे अमेरिका बनला जगातील 'सर्वात श्रीमंत देश', डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; म्हणाले, 'प्रत्येक नागरिकाला 2000 डॉलर देणार...'

Crime News: क्रूर पती! 'दृश्यम' चित्रपट पाहिला आणि रचला पत्नीच्या खुनाचा कट; गळा दाबून हत्या, पुरावा मिटवण्यासाठी भयानक कृत्य

Terrorist Attack: दहशतवादी कटाचा पर्दाफाश! डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX आणि AK-47 जप्त; तपास यंत्रणांची धावपळ

Wasim Akram: "उनको गेंदबाजी करना मतलब एक परीक्षा..." वसीम अक्रमने भारतीय क्रिकेटपटूबाबत केलेलं विधान चर्चेत

SCROLL FOR NEXT