IND vs ENG: कारगिल युद्धात लढलेल्या जवानाचा मुलगा टीम इंडियासाठी ठरला संकटमोचक, जुरेलचे अर्धशतकानंतर खास सेलिब्रेशन

Dhruv Jurel Salute Celebration: भारताकडून इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत ध्रुव जुरेलने अर्धशतकानंतर सॅल्युट ठोकत सेलिब्रेशन केले होते.
Dhruv Jurel Salute Celebration
Dhruv Jurel Salute CelebrationX
Published on
Updated on

Dhruv Jurel Salute Celebration after scoring fifty in India vs England 4th Test in Ranchi:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात रांचीमध्ये कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना शुक्रवारपासून (23 फेब्रुवारी) चालू झाला आहे. या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात 23 वर्षीय यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने 90 धावांनी शानदार खेळी केली. दरम्यान, त्याचे अर्धशतकानंतरचे सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरला.

या सामन्यात भारताने 177 धावांवर 7 विकेट्स गमावल्या होत्या. परंतु, नंतर जुरेलने 9 व्या आणि 10 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कुलदीप यादव आणि आकाश दीप यांच्यासह महत्त्वापूर्ण भागीदाऱ्या करत भारताला 307 धावांपर्यंत पोहचवले. पण त्याचीच भारताच्या पहिल्या डावातील शेवटची विकेट ठरली.

त्याने 149 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 90 धावांची खेळी केली. त्याने 96 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते. अर्धशतकानंतर त्याने सॅल्युट करत सेलिब्रेशन केले.

Dhruv Jurel Salute Celebration
IND vs ENG: जुरेलची झुंज अखेर नव्वदीत संपली, टीम इंडिया 307 धावांवर ऑल-आऊट; इंग्लंडकडे आघाडी

दरम्यान, अनेकांना हे माहिती नसेल की जुरेलचे वडील हवालदार म्हणून भारतीय सैन्यातून निवृत्त झाले आहेत. त्याचे वडील नेम सिंग जुरेल यांनी कारगिल युद्धातही भारतीय सैन्याकडून भाग घेतलेला होता. ध्रुवनेही भारतीय सैन्यात सामील व्हावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र, ध्रुव जुरेलने क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्याचा निर्णय घेतला.

ध्रुव जुरेलने यापूर्वीच बीसीसीआयशी बोलताना सांगितले होते की जर त्याला भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली, तर तो क्षण तो त्याच्या वडिलांना समर्पित करेल, कारण ते नेहमीच त्याच्यासाठी आदर्श राहिले आहेत. त्यांनी नेहमीच त्याला मार्गदर्शन केले आहे.

Dhruv Jurel Salute Celebration
IND vs ENG, Video: रांची कसोटीदरम्यान BCCI प्रोडक्शन टीमने दंडाला का बांधली काळी फित? 'हे' आहे कारण

दरम्यान, जुरेलने 90 धावांची खेळी करताना 8 व्या विकेटसाठी कुलदीप यादवबरोबर 76 धावांची भागीदारी केली. कुलदीपने 131 चेंडू खेळताना २८ धावा केल्या. त्याचबरोबर ९ व्या विकेटसाठी आकाश दीप बरोबर जुरेलने 40 धावांची भागीदारी केली.

या डावात भारताकडून आधी यशस्वी जयस्वालने 73 धावांची खेळी केली होती. तसेच शुभमन गिलने 38 धावांची खेळी केली होती. पण याव्यतिरिक्त कोणाला खास काही करता आले नाही. भारताने पहिल्या डावात 103.2 षटकात सर्वबाद 307 धावा केल्या.

तत्पुर्वी इंग्लंडचा संघ 353 धावांवर पहिल्या डावात सर्वबाद झाला होता. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 46 धावांची आघाडी मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com