Matthew Wade Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: धोनी अन् डी कॉकच्या खास क्लबमध्ये मॅथ्यू वेडची एन्ट्री, टी-20 मध्ये केली 'ही' खास कामगिरी

India vs Australia 4th T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना आज (01 डिसेंबर) रायपूरमध्ये खेळवला जात आहे.

Manish Jadhav

India vs Australia 4th T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना आज (01 डिसेंबर) रायपूरमध्ये खेळवला जात आहे. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची कामगिरी वाखाणण्याजोगी झाली. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने विशेष कामगिरी केली. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून 50 बळी घेणारा तो पाचवा क्रिकेटर ठरला आहे. रायपूरमध्ये भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचा विकेटच्या मागे झेल घेत वेडने ही खास कामगिरी केली आहे.

क्विंटन डी कॉकच्या नावावर एक खास विक्रम

दरम्यान, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेटच्या मागे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या नावावर आहे. डी कॉकने 2012 पासून 80 सामने खेळताना 79 डावांमध्ये सर्वाधिक 76 झेल घेतले आहेत. त्याच्यानंतर इंग्लिश खेळाडू बटलरचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी तिसऱ्या, केनियाचा इरफान करीम चौथ्या आणि आता मॅथ्यू वेड पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

T20I मध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू:

76 – क्विंटन डी कॉक – दक्षिण आफ्रिका

59 – जोस बटलर – इंग्लंड

57 – एमएस धोनी – भारत

51 – इरफान करीम – केनिया

50* – मॅथ्यू वेड – ऑस्ट्रेलिया

मॅथ्यू वेड आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द:

मॅथ्यू वेडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने कांगारु संघासाठी आतापर्यंत एकूण 212 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याने 205 डावात 4568 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेडच्या नावावर पाच शतके आणि 19 अर्धशतके आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT