IND vs AUS, 4th T20: 'प्लेइंग-11'मध्ये बदल निश्चित! श्रेयसचे कमबॅक, तर मॅक्सवेलसह विश्वविजेते खेळाडू परतले घरी

India vs Australia, 4th T20I: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात शुक्रवारी चौथा टी२० सामना होणार आहे.
India vs Australia
India vs AustraliaPTI
Published on
Updated on

India vs Australia, 4th T20I Match at Raipur, Predicted Playing XI:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले असून चौथा सामना शुक्रवारी (1 डिसेंबर) होणार आहे. हा सामना रायपूरला होणार आहे. दरम्यान, या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणे निश्चित आहे.

श्रेयस अय्यरचे पुनरागमन

चौथ्या सामन्यापूर्वी भारतीय संघात श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे तो आता चौथ्या आणि पाचव्या टी२० सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून काम पाहिल. याआधी पहिल्या तिन्ही सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवसह ऋतुराज गायकवाडने उपकर्णधार म्हणून काम पाहिलं होतं.

दरम्यान, श्रेयस अय्यरचे उपकर्णधार म्हणून पुनरागमन झाले असल्याने भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणे जवळपास निश्चित आहे. तसेच दीपक चाहरचाही संघात समावेश करण्यात आला आहे, त्याचबरोबर मुकेश कुमारही त्याचे लग्न उरकून संघात सामील झाला आहे. त्याचमुळे श्रेयस, दीपक आणि मुकेश यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

India vs Australia
IND vs AUS: विसावे षटक, 53 धावा अन् दोन शतके! तिसऱ्या T20 मध्ये शेवटच्या ओव्हरचा ड्रामा

श्रेयस अय्यरला तिलक वर्माच्या जागेवर संधी दिली जाऊ शकते. कारण फलंदाजी फळीतील अन्य कोणाला बाहेर करण्याची शक्यता कमी आहे. यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांची जोडी सलामीला स्थिरावली आहे.

तसेच ईशान किशन यष्टीरक्षणाबरोबर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. त्याचबरोबर कर्णधार सूर्यकुमारही मधल्या फळीत आहे. त्याचमुळे श्रेयसला जागा देण्यासाठी तिलकलाच आपली जागा सोडावी लागू शकते.

याशिवाय मुकेशला आवेश खान ऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. मुकेशने जेव्हा तिसऱ्या सामन्यातून सुटी घेतली होती, तेव्हा त्याच्या जागेवर आवेश खेळला होता. आता पुन्हा मुकेश आल्याने आवेशला बाहेर बसावे लागू शकते. याशिवाय प्रसिध कृष्णाच्या जागेवर सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केलेल्या दीपक चाहरला संधी दिली जाऊ शकते.

ऑस्ट्रेलियन संघातही होणार बदल

चौथ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात मोठे बदल झाले आहे. वर्ल्डकप 2023 विजेतेपद जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील जे खेळाडू या टी20 मालिकेचाही भाग होते, त्यांना ऑस्ट्रेलिया क्रिकेटने विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ विश्वविजेत्या ऑस्ट्रलियन संघातील ट्रेविस हेड या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात कायम आहे.

तसेच ऍडम झम्पा आणि स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या सामन्यापूर्वीच मायदेशी परतले होते, तर ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, जोश इंग्लिस आणि सीन ऍबॉट हे खेळाडू तिसऱ्या सामन्यानंतर मायदेशी गेले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल होणे निश्चित आहे.

India vs Australia
IND vs SA: साई सुदर्शनला पहिल्यांदाच मिळाली टीम इंडियात संधी, आफ्रिकेविरुद्ध करु शकतो डेब्यू!

ट्रेविस हेड आणि मॅथ्यू शॉर्ट सलामीला खेळू शकतात. तसेच ऍरॉन हार्डीही संघात कायम राहू शकतो, तर मधल्या फळीत बेन मॅकडरमॉटला संधी मिळू शकते. याशिवाय अष्टपैलू ख्रिस ग्रीनला पदार्पणाची संधी मिळू शकते.

दरम्यान, केन रिचर्डसन तिसऱ्या टी20 सामन्यामध्ये दुखापतग्रस्त झाला होता, त्यामुळे त्याला चौथ्या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागेवर बेन ड्वारशुईला संधी मिळू शकते. तसेच यष्टीरक्षक आणि कर्णधार पदाची जबाबदारी मॅथ्यू वेड सांभाळेल.

चौथ्या टी20 सामन्यासाठी संभावित प्लेइंग-11

  • भारत - यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, दीपक चाहर, मुकेश कुमार

  • ऑस्ट्रेलिया - ट्रेविस हेड, मॅथ्यू शॉर्ट, ऍरॉन हार्डी, बेन मॅकडरमॉट, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक/कर्णधार), टीम डेव्हिड, ख्रिस ग्रीन, बेन ड्वारशुई, नॅथन एलिस, जेसन बेऱ्हेंनडॉर्फ, तन्वीर संघा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com