IND vs AUS: चौथ्या टी20 सामन्यापूर्वी स्टेडियममधील वीजच गायब! तब्बल 3.16 कोटींचं थकवलं बिल

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी20 सामना होणाऱ्या रायपूरमधील स्टेडियमचा विद्यूत प्रवाह कापण्यात आल्याचे समजत आहे.
Team India
Team IndiaPTI

India vs Australia, 4th T20I:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात टी२० मालिकेतील चौथा सामना रायपूरमधील शहिद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना शुक्रवारी (1 डिसेंबर) संध्याकाळी 7 वाजता खेळवण्यात येणार आहे.

मात्र, या सामन्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्टेडियममधील काही क्षेत्रातील वीजप्रवाह खंडीत करण्यात आला आहे. यामागे थकलेले विद्यूत बिल हे कारण सांगण्यात येत आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार 2009 पासून हे विद्यूत बिल थकलेले आहेत. तब्बल 3.16 कोटी बिल थकले आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वीच या स्टेडियमचा विद्यूत प्रवाह कापण्यात आला होता.

Team India
IND vs AUS: चौथ्या T20 सामन्यासाठी टीम इंडिया रायपूरमध्ये दाखल, जाणून घ्या मैदानावरील रेकॉर्ड!

सध्या छत्तीसगढ क्रिकेट असोसिएशनच्या विनंतीवरून तात्काळ कनेक्शन बसवण्यात आले आहे. परंतु, त्यातून केवळ स्टँड्समध्ये आणि काही खोल्यांमध्ये विद्यूत पुरवठा होत आहे. स्टेडियमवरील फ्लडलाईट्स सामन्यावेळी जनरेटरवर चालवण्यात येणार आहेत.

साल 2018 मध्ये हाफ - मॅरोथॉन दरम्यान देखील स्टेडियममध्ये विद्यूत प्रवाह नसल्याने गोंधळ झाला होता. स्टेडियम बांधल्यानंतर त्याच्या देखभालाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) सोपविण्यात आली होती, उर्वरित खर्च क्रीडा विभागाने उचलायचा होता. मात्र, सद्या दोन्ही विभागांकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत.

Team India
IND vs AUS, 4th T20: 'प्लेइंग-11'मध्ये बदल निश्चित! श्रेयसचे कमबॅक, तर मॅक्सवेलसह विश्वविजेते खेळाडू परतले घरी

वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीने अनेकदा थकलेल्या बिलाबाबत पीडब्ल्यूजी आणि क्रीडा विभागाला नोटीस पाठवल्या आहेत, पण अद्यापही पैसे भरण्यात आले नाहीत.

दरम्यान, रायपूरमधील या स्टेडियमवर आत्तापर्यंत एकच आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला आहे. हा सामना याचवर्षी भारत आणि न्यूझीलंड संघात झाला होता. हा वनडे सामना होता. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com