Rohit Sharma  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड मालिकेपूर्वीच आली धक्कादायक बातमी, दुखापतीमुळे 'हा' खेळाडू...

India VS New Zealand Odi Series: भारताचा न्यूझीलंड दौरा 18 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यादरम्यान दोन्ही संघ तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहेत.

दैनिक गोमन्तक

India VS New Zealand Odi Series: भारताचा न्यूझीलंड दौरा 18 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यादरम्यान दोन्ही संघ तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहेत. दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. या एकदिवसीय मालिकेतून एका घातक वेगवान गोलंदाजाला वगळण्यात आले आहे. हा खेळाडू नुकताच जखमी झाला होता, त्यामुळे त्याला वनडे मालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा खेळाडू वनडे मालिकेतून बाहेर

न्यूझीलंडचा (New Zealand) वेगवान गोलंदाज मेट हेन्री पोटाच्या स्नायूंच्या ताणामुळे पाकिस्तान आणि भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी हेन्रीला दुखापत झाली होती. प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाडून (NZC) सांगण्यात आले की, "मॅट हेन्री कसोटी संघातील इतर सदस्यांसह मायदेशी परतेल, जो कराचीतील दुसऱ्या कसोटीच्या 5 व्या दिवशी दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळू शकला नाही."

न्यूझीलंड संघाचा पाकिस्तान दौरा

पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) न्यूझीलंडची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका कराचीमध्ये 9 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यानंतर 11 आणि 13 जानेवारीला सामने होतील. दौरा संपल्यानंतर, न्यूझीलंड 18 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत तीन एकदिवसीय आणि तितक्याच टी-20 सामन्यांसाठी भारताचा दौरा करेल. केन विल्यमसन पाकिस्तानविरुद्धच्या वनडेसाठी न्यूझीलंडचा कर्णधार असेल. तर टॉम लॅथम भारताविरुद्ध हैदराबाद, रायपूर आणि इंदूर येथे अनुक्रमे 18, 21 आणि 24 जानेवारीला होणाऱ्या 50 षटकांच्या सामन्यांसाठी कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.

भारताचा न्यूझीलंड दौरा

तारीख आणि ठिकाण

  • 18 जानेवारी पहिली वनडे हैदराबाद

  • 21 जानेवारी 2रा एकदिवसीय रायपूर

  • 24 जानेवारी 3रा एकदिवसीय इंदूर

  • 24 जानेवारी 3रा एकदिवसीय इंदूर 27 जानेवारी 1ला T20 रांची

  • 29 जानेवारी दुसरी टी-20 लखनौ

  • 1 फेब्रुवारी 3रा T20 अहमदाबाद

पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय सामन्यासाठी न्यूझीलंड संघ:

केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, हेन्री शिपले, ईश सोढी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Prime Minister Dance: दमादम मस्त कलंदर... शिबानी कश्यपच्या गाण्यावर पंतप्रधानांचा भन्नाट डान्स, रंगली अविस्मरणीय मैफल Watch Video

Shefali Jariwala: तू नेहमी माझ्या हृदयात... शेफालीच्या मृत्यूनंतर पती दुःखातून सावरेना, बघा काय केलं? Watch Video

Nachinola House Fire: नास्नोळा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, 5 लाखांचे नुकसान

'माझे घर' योजनेचा लाभ घ्या; मुख्यमंत्री सावंतांचे गोमंतकीयांना आवाहन, 1972 पूर्वीची घरे नियमित होणार

Amba Ghat Landslide: कोकणात मुसळधार पावसाचा तडाखा, आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT