IND vs NZ: सॅमसनला तिसऱ्या वनडेतही संधी नाहीच! अशी आहे 'प्लेइंग इलेव्हन'

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना ख्राईस्टरर्च येथे बुधवारी होत आहे.
Sanju Samson
Sanju SamsonDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs NZ: न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात बुधवारी वनडे मालिकेतील तिसरा सामना ख्राइस्टचर्च येथे होत आहे. या सामन्यात पावसामुळे नाणेफेक १५ मिनिट उशीरा झाली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या सामन्यासाठी भारताने आपल्या ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे या सामन्यातही संजू सॅमसन खेळताना दिसणार नाही. त्याला वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात संधी मिळाली होती. मात्र, त्यानंतर दुसऱ्या सामन्यातून त्याला वगळले होते आणि आता तिसऱ्या सामन्यातही त्याला ११ जणांच्या संघात जागा दिलेली नाही.

सॅमसन (Sanju Samson) सध्या चांगल्या लयीत आहे. त्याने पहिल्या वनडेतही ३६ धावांची छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केली होती. पण तरीही त्याला अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळत नसल्याने भारतीय संघव्यवस्थापनेवर गेल्या काही दिवसांपासून टीका होत आहे.

Sanju Samson
Sanju Samson Video: मोठ्या मनाचा सॅमसन! संधी मिळाली नाही, पण माणूसकी दाखवत जिंकली मनं

सहाव्या गोलंदाजासाठी सॅमसनला वगळले

न्यूझीलंडविरुद्धचा (India vs New Zealand) दुसरा वनडे सामना पावसामुळे १२.५ षटकांच्या खेळ झाल्यावर रद्द झाल्यानंतर कर्णधार शिखर धवनने सॅमसनला वगळण्याचे कारण सांगितले होते. तो म्हणाला होता की सहावा गोलंदाजी पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून सॅमसनला वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी अष्टपैलू दीपक हुडाची निवड करण्यात आली.

मालिका वाचवण्याचे भारतासमोर आव्हान

दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला होता. त्यामुळे त्यांनी १-० अशी आघाडी घेतलेली. तसेच दुसरा सामना रद्द झाला. त्यामुळे आता भारताला मालिका पराभूत होण्यापासून वाचण्यासाठी तिसऱ्या वनडेत विजय आवश्यक आहे. कारण तिसऱ्या सामन्यात भारत पराभूत झाला किंवा सामना रद्द झाला किंवा बरोबरीत सुटला, तर न्यूझीलंड ही मालिका आपल्या नावे करतील.

तिसऱ्या वनडेसाठी ११ जणांचे संघ

भारत - शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

न्यूझीलंड - फिन ऍलेन, डेवॉन कॉनवे, केन विलियम्सन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटेनर, ऍडम मिलने, मॅट हेन्री, टीम साऊदी, लॉकी फर्ग्यूसन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com