Team India
Team IndiaDainik Gomantak

IND vs NZ, 3rd ODI: टीम इंडियाचं मालिका विजयाचं स्वप्न भंगलं! पावसाची जोरदार 'बॅटिंग'

न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यात बुधवारी होणारा तिसरा वनडे सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
Published on

न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील वनडे मालिकेतील बुधवारी होणारा तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. या मालिकेतील दुसरा सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतल्याने न्यूझीलंडने ही मालिका आपल्या नावावर केली आहे. टॉम लॅथमला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Team India
IND A vs BAN A: भारताने बांगलादेशला 112 धावांत गुंडाळले; सलामीवीरांचीही नाबाद अर्धशतके

तिसऱ्या वनडेत भारताने पूर्ण 50 षटकांचा खेळ केला होता. मात्र, न्यूझीलंड 18 षटकांत 1 बाद 104 धावांवर असताना पावसाने व्यत्यय आणला. अखेर काहीवेळ प्रतिक्षा केल्यानंतर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारताने न्यूझीलंडला 220 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून फिन ऍलेन आणि डेवॉन कॉनवेने 97 धावांची सलामी भागीदारी रचली होती. पण ही भागीदारी उमरान मलिकने तोडली. त्याने ऍलेनला 57 धावांवर बाद केले. पण नंतर कॉनवे 38 आणि कर्णधार केन विलियम्सन शून्य धावेवर नाबाद असताना पावसाला सुरुवात झाली.

तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना 47.3 षटकांत सर्वबाद 219 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 51 धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने 49 धावा केल्या. तसेच कर्णधार शिखर धवनने 28 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने 20 धावांचा टप्पा ओलांडला नाही.

न्यूझीलंडकडून ऍडम मिलने आणि डॅरिल मिशेलने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच टीम साऊदीने 2 विकेट्स, तर लॉकी फर्ग्युसन आणि मिशेल सँटेनरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com