IND vs NZ: महान फलंदाज Viv Richards यांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी टीम इंडियाचा गब्बर सज्ज!

India vs New Zealand, 1st ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद शिखर धवनकडे आहे.
Shikhar Dhawan
Shikhar DhawanDainik Gomantak

Shikhar Dhawan Record: न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद शिखर धवनकडे आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना उद्या ऑकलंड येथे सकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल. शिखर धवन एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे महान फलंदाज विव रिचर्ड्स यांचा मोठा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

धवन महान फलंदाज व्हिव्ह रिचर्ड्सचा हा मोठा विक्रम मोडण्याच्या जवळ

उद्या ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) पहिल्या वनडेत शिखर धवन फलंदाजीसाठी उतरेल तेव्हा तो वेस्ट इंडिजचे महान फलंदाज विव रिचर्ड्स यांचा मोठा विक्रम मोडू शकतो. उद्या ऑकलंडच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवनने (Shikhar Dhawan) 50 धावा केल्या तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडिजचे फलंदाज विव रिचर्ड्स यांना मागे टाकेल.

Shikhar Dhawan
IND vs NZ 3rd T20 Match: टीम इंडियाने रचला इतिहास, पहिल्यांदाच T20 मालिका जिंकून केला हा पराक्रम

पहिल्या एकदिवसीय सामन्यात करणार हे अप्रतिम!

शिखर धवनच्या नावावर सध्या 161 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6,672 धावा करण्याचा विक्रम आहे. शिखरने आणखी 50 धावा केल्या तर त्याच्या वनडे क्रिकेटमध्ये 6,722 धावा होतील. अशा परिस्थितीत तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विव रिचर्ड्स यांच्या पुढे जाईल. विव रिचर्ड्स यांनी 187 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6,721 धावा केल्या होत्या.

Shikhar Dhawan
IND vs NZ: T20 मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये बदल; या खेळाडूंना मिळणार संधी

शिखर धवन 2023 विश्वचषक खेळण्यासाठी मोठा दावेदार

शिखर धवनची बॅट वनडे क्रिकेटमध्ये जबरदस्त बोलते. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शिखर धवन शुभमन गिलसोबत डावाची सुरुवात करणार आहे. शिखरच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 17 शतके झळकावण्याचा विक्रम आहे. शिखर धवन हा एकदिवसीय क्रिकेटमधील अनुभवी फलंदाज असून त्याने भारताला स्वबळावर अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. 36 वर्षीय शिखर धवन 2023 मध्ये भारतात होणारा विश्वचषक खेळण्याचा मोठा दावेदार मानला जात आहे. शिखर धवनला अलीकडेच आयपीएलमधील पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com