West Indies Team  Dainik Gomantak
क्रीडा

वेस्ट इंडिजला दोनदा वर्ल्ड कप जिंकून देणारा सॅम्युअल्स अडकला भ्रष्टाचारात, ICC ची मोठी कारवाई

Marlon Samuels: अबू धाबी T10 लीग दरम्यान अमिराती क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेअंतर्गत 4 गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला आहे.

Manish Jadhav

Marlon Samuels: वेस्ट इंडिजला 2 वेळा विश्वविजेता बनवणारा मार्लन सॅम्युअल्स अडचणीत सापडला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला आता 4 वर्षे जुन्या प्रकरणात दोषी ठरवले आहे.

वेस्ट इंडिजचा माजी स्टार खेळाडू सॅम्युअल्स 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या अबू धाबी T10 लीग दरम्यान अमिराती क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेअंतर्गत 4 गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला आहे.

सप्टेंबर 2021 मध्ये, ICC ने त्याच्यावर आरोप लावले होते आणि त्याला स्वतःवरील आरोपाला उत्तर देण्यासाठी 14 दिवसांचा अवधी देण्यात आला होता.

दरम्यान, तब्बल 3 वर्षांनंतर तो त्या प्रकरणात दोषी आढळला आहे. सॅम्युअल्सला कलम 2.4.2, 2.4.3, 2.4.6 आणि 2.4.7 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. 2012 आणि 2016 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज (West Indies) संघाचा सॅम्युअल्स भाग होता.

सामन्याची माहिती लीक झाली होती

सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजकडून 71 कसोटी, 207 एकदिवसीय आणि 67 टी-20 सामने खेळले. 2000 ते 2018 दरम्यान, त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 11,134 धावा केल्या आणि 152 विकेट घेतल्या. 2008 मध्येही त्याच्यावर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

खरेतर, फेब्रुवारी 2007 मध्ये वेस्ट इंडिज मालिकेत तो सामन्याची माहिती लीक केल्याप्रकरणी दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.

2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती

दुसरीकडे, पोलिसांना एक टेप सापडला होता, ज्यामध्ये सॅम्युअल्स सामन्याशी संबंधित माहिती सट्टेबाजाला देत होता. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले होते.

चौकशीनंतर वेस्ट इंडिज बोर्डाने आपल्या स्टार खेळाडूवर 2 वर्षांची बंदी घातली होती. मात्र, 2010 मध्ये त्याने पुन्हा पुनरागमन करुन वेस्ट इंडिजला अनेक आश्चर्यकारक विजय मिळवून दिले.

शिक्षा होऊनही धडा शिकला नाही

तसेच, 2020 मध्ये सॅम्युअल्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती घेतली. सर्वोतोपरी प्रयत्न करुनही सॅम्युअल्स 2008 मध्ये त्याच्यावरील डाग पुसू शकला नाही.

एवढेच नाही तर एकदा शिक्षा होऊनही तो यातून धडा घेऊ शकला नाही. वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याने क्रिकेटला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT