Team India Break 18 Years Old Own Record: त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात वनडे मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (1 ऑगस्ट) पार पडला. या सामन्यात भारताने तब्बल 200 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. दरम्यान, तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने मोठा विक्रम केला आहे.
तिसऱ्या वनडेत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 351 धावा केल्या होत्या. भारताकडून शुभमन गिल (85), इशान किशन (77) हार्दिक पंड्या (70*) आणि संजू सॅमसन 51 यांनी अर्धशतके झळकावली.
त्यामुळे भारताने वनडेत डावात कोणत्याही खेळाडूने शतक न करतानाही आपली सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. त्याचबरोबर 18 वर्षांपूर्वीचा आपला विक्रम मोडला आहे.
18 वर्षांपूर्वी साल 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध नागपूरला झालेल्या वनडे सामन्यातच भारताने कोणत्याही खेळाडूच्या शतकाशिवाय देखील 6 बाद 350 धावा केल्या होत्या. त्यावेळी सचिन तेंडुलकरने 93, राहुल द्रविडने नाबाद 95 आणि इरफान पठाणने 83 धावांची खेळी केली होती. तसेच भारताने श्रीलंकेला 152 धावांनी पराभूत केले होते.
दरम्यान मंगळवारी झालेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास या सामन्यात भारताने दिलेल्या 352 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 35.3 षटकात 151 धावांवर सर्वबाद झाला.
वेस्ट इंडिजकडून 10 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या गुडाकेश मोतीने सर्वाधिक नाबाद 39 धावांची खेळी केली. त्याने अल्झारी जोसेफबरोबर 10 व्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजला 140 धावांचा टप्पा पार करण्यात यश मिळाले. पण जोसेफ 26 धावांवर बाद झाल्याने त्यांची भागीदारी तुटली.
तत्पुर्वी अलिक अथानाझने 32 धावांची खेळी केली. तसेच यानिक कॅरियाने 19 धावांची खेळी केली. याशिवाय वेस्ट इंडिजकडून कोणालाही दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मुकेश कुमारने 3 विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने 2 विकेट्स आणि जयदेव उनाडकटने 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.