Devdutt Padikkal And Avesh Khan Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2024: आवेश खान करणार राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व... आता 'या' संघांमध्ये दिसणार गेम चेंजर्स

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नवीन हंगामासाठी लवकरच खेळाडूंसाठी बोली लागणार आहे.

Manish Jadhav

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नवीन हंगामासाठी लवकरच खेळाडूंसाठी बोली लागणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये अनेक नवे चेहरेही पाहायला मिळणार आहेत. आयपीएल फ्रँचायझी काही खेळाडूंवर मोठी बोली लावू शकतात, ज्यांनी 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत शानदार कामगिरी केली.

त्याचवेळी, आयपीएल 2024 लिलावापूर्वी काही संघ त्यांच्या खेळाडूंची देवाणघेवाण करत आहेत. आता या यादीत लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सचीही नावे जोडली गेली आहेत. या दोन्ही संघांनी आयपीएलच्या नव्या हंगामासाठी प्रत्येकी एक खेळाडू बदलला आहे.

आवेश खान आणि देवदत्त पडिक्कल यांची बदली करण्यात आली

दरम्यान, बुधवारी (22 नोव्हेंबर) लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आवेश खान आणि देवदत्त पडिक्कल यांच्या आदला-बदलीसाठी करार केला. त्यानंतर आता आवेश खान आयपीएलच्या नवीन हंगामात राजस्थान रॉयल्सकडून तर देवदत्त पडिक्कल लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे.

दुसरीकडे, देवदत्तची आयपीएलमधील (IPL) ही तिसरी फ्रँचायझी असेल. याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्याकडून तो खेळला आहे. ओपनिंग बॅट्समन म्हणून आयपीएल कारकिर्दीची प्रभावी सुरुवात केल्यानंतर देवदत्तचा राजस्थानने त्यांच्या संघात समावेश केला होता. पण त्याचा शेवटचा सीझन काही खास नव्हता.

पडिक्कलच्या समावेशामुळे काइल मेयर्स, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन आणि कृणाल पांड्या यांसारख्या खेळाडूंसह सुपर जायंट्सचे आधीच मजबूत असणारे फलंदाजी युनिट आणखी मजबूत होईल.

दुसरीकडे, आवेशचीही अशीच कहाणी आहे. आवेश खानसाठी आयपीएल 2022 चा हंगाम चांगला गेला होता, जिथे तो LSG साठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून पुढे आला होता, परंतु त्यानंतर त्याचा फॉर्म मंदावला. लखनऊमधील संथ खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना फारशी मदत करत नाही.

आता जयपूरच्या वेगवान खेळपट्ट्यांवर आवेश खानला आणखी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. आवेश खानच्या आगमनानंतर राजस्थानची वेगवान गोलंदाजीची फळी मजबूत होईल. या संघात पहिल्यांदाच नवदीप सैनी, कुलदीप सेन आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे वेगवान गोलंदाज आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT