ठरलं तर! पहिल्यांदाच परदेशात रंगणार IPL 2024 लिलाव, 'या' दिवशी लागणार खेळाडूंवर बोली

IPL Auction: आयपीएल 2024 हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पहिल्यांदाच परदेशात होणार आहे.
IPL Auction 2023
IPL Auction 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2024 Auction date:

इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा 17 वा हंगाम पुढील वर्षी म्हणजेच 2024 साली खेळवला जाणार आहे. या हंगामासाठी आता तयारी सुरु झाली असून संघांसाठी ट्रेडिंग विंडोही सुरु झाली आहे. त्यातच आता या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावाची तारिख समोर आली आहे.

इएसपीएन क्रीकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडेल. यावेळी 10 फ्रँचायझी आपापला संघबांधणीसाठी खेळाडूंवर बोली लावताना दिसतील. दरम्यान, आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच परदेशात होणार आहे. यापूर्वी झालेले लिलाव भारतात झाले होते.

IPL Auction 2023
IPL 2024: मुंबई इंडियन्सचं त्रिकुट पुन्हा एकत्र! मलिंगाकडे सोपवली संघाची मोठी जबाबदारी

मीडिया रिपोर्ट्सनुसाह हा लिलाव दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये होणार आहे. याबाबत शुक्रवारी बीसीसीआयने निर्णय घेतला आहे.

दरम्यान, अशीही माहिती मिळत आहे की सर्व 10 फ्रँचायझींना आपल्या संघात कायम केलेल्या खेळाडूंची आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी 26 नोव्हेंबरपर्यंत सादर करावी लागणार आहे.

त्याचबरोबर यंदा फ्रँचायझींसाठी लिलावाच्या पैशांमध्ये म्हणजेच पर्स मनी वाढवण्यात आली आहे. यावेळी फ्रँचायझींकडे खेळाडूंवर बोली लावण्यासाठी 100 कोटी रुपये असणार आहेत. दरम्यान, आगामी हंगाम हा खेळाडूंच्या तीन वर्षांच्या करारातील अखेरचा हंगाम असणार आहे. त्यानंतर पुन्हा पुढीलवर्षी 2025 हंगामासाछी मेगा लिलाव पार पडेल.

IPL Auction 2023
World Cup 2023: 'ICC, टीम इंडिया आणि वेगळा बॉल!' पाकिस्तानी क्रिकेटरचा हस्यास्पद दावा अन् आकाश चोप्राची फटाकेबाजी

दरम्यान, आयपीएल 2024 साठी ट्रेडिंग विंडो सुरू झाल्यानंतर वेस्ट इंडिजच्या रोमारियो शेफर्डला ट्रेड करण्यात आले आहे. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सकडे ट्रेड केले आहे. त्यामुळे 2023 आयपीएलमध्ये लखनऊकडून खेळलेला शेफर्ड आता आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.

आयपीएलचे झाले 16 हंगाम

आयपीएलचे आत्तापर्यंत 16 हंगाम झाले आहेत. आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

तसेच कोलकाता नाईट रायडर्सने 2 वेळा विजेतेपद जिंकले आहे. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स आणि गुजरात टायटन्स या संघांनी प्रत्येकी एकवेळा विजेतेपद जिंकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com