गंभीरचे KKR मध्ये पुनरागमन! लखनऊची साथ सोडली, आता IPL 2024 मध्ये निभावणार 'ही' जबाबदारी

Gautam Gambhir: गंभीरचे कोलकाता नाईट रायडर्स संघात पुनरागमन झाले आहे.
Gautam Gambhir
Gautam GambhirX/KKRiders

Gautam Gambhir joins KKR ahead of IPL 2023:

इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) स्पर्धेची तयारी संघांकडून सुरू झाली असून सपोर्ट स्टाफमध्ये बदल होताना दिसत आहे. आता कोलकाता नाईट रायडर्स संघाकडूनही मोठी घोषणा करण्यात आली आहे. केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी घोषित केले आहे की गौतम गंभीर केकेआर संघात पुन्हा सामील होणार आहे.

गंभीर आयपीएलमध्ये आता केकेआरचा मार्गदर्शन (Mentor) म्हणून जबाबदारी सांभाळताना दिसेल. यापूर्वी गंभीर केकेआरकडून खेळाडू म्हणून खेळला आहे. तो 2011 ते 2017 दरम्यान केकेआर संघात होता. त्याने या संघाचे नेतृत्वही केले.

तसेच त्याच्याच नेतृत्वाखाली केकेआरने 2012 आणि 2014 साली आयपीएलचे विजेतेपदही पटकावले आहे. त्याचबरोबर 5 वेळा संघ प्लेऑफसाठीही पात्र ठरला होता. याशिवाय 2014 साली चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामनाही केकेआरने खेळला.

Gautam Gambhir
ठरलं तर! पहिल्यांदाच परदेशात रंगणार IPL 2024 लिलाव, 'या' दिवशी लागणार खेळाडूंवर बोली

दरम्यान, गंभीर गेली दोन वर्षे आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाबरोबर मार्गदर्शक म्हणून काम करत होता. पण आता त्याने या संघाची साथ सोडली आहे. आता तो आयपीएल 2024 पासून केकेआर संघाबरोबर दिसेल.

याबद्दल गंभीर म्हणाला, 'मी भावनिक व्यक्ती नाही आणि अनेक गोष्टी मला हलवू शकत नाहीत. पण हे वेगळे आहे. जिथून सुरुवात झाली तिथे परत जाण्यासारखे आहे. मी पुन्हा जांभळ्या आणि सोनेरी जर्सी घालण्यास आतुर आहे. मी फक्त केकेआरमध्ये परत येत नाहीये, तर सिटी ऑफ जॉय (कोलकाता) मध्ये परत येत आहे. मी भूकेला आहे, माझा 23 क्रमांक आहे. अमी केकेआर.'

Gautam Gambhir
ICC Change World Cup Venue: 2024 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपचे ICC ने बदलले ठिकाण, श्रीलंकेला दुसरा मोठा झटका!

केकेआरचा सहसंघमालक शाहरुख खान गंभीरबद्दल म्हणाला, 'गौतम नेहमीच या कुटुंबाचा भाग राहिला आहे आणि आमचा कर्णधार मार्गदर्शकाच्या नव्या भूमिकेत पुन्हा घरी येत आहे. आम्ही त्याला खूप मिस केले आणि आता चंदू सर व गौतम केकेआर संघात जादू दाखवताना पाहण्यासाठी उत्सुक आहे.'

गंभीर आता केकेआर संघात मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत यांच्यासह सपोर्ट्स स्टाफबरोबर काम करताना दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com