Lionel Messi vs Cristiano Ronaldo Dainik Gomantak
क्रीडा

Lionel Messi vs Cristiano Ronaldo: लिओनेल मेस्सीने 1000 व्या सामन्यात क्रिस्तियानो रोनाल्डोला टाकले मागे

क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटिना नेदरलँडशी भिडणार

Akshay Nirmale

Lionel Messi vs Cristiano Ronaldo: फिफा फुटबॉल वर्ल्डकपमधील राऊंड ऑफ-16 च्या थराराला सुरवात झाली आहे. या राऊंडमधील दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत क्वार्टर फायनल फेरी गाठली. हा सामना अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याचा 1000 वा सामना होता. यात मेस्सीने गोल नोंदवत पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो याला मागे टाकले आहे. (Fifa World Cup 2022)

अर्जेंटिना संघाने या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-1 अशी मात दिली. या नॉकआऊट सामन्यात मेस्सीचे योगदान महत्वाचे राहिले. मेस्सीने 35 व्या मिनिटालाच गोल करत आघाडी मिळवून दिली होती. या गोलमुळे फुटबॉल वर्ल्डकपमध्ये स्वतःच्या संघाकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे.

मेस्सीचा हा वर्ल्डकपमधील 9 वा गोल आहे. त्याने अर्जेंटिनाचाच फुटबॉलस्टार दिएगो मॅरोडोना यांना मागे टाकले आहे. मॅराडोना यांनीही अर्जेंटिनाकडून 8 गोल नोंदवले आहेत. विशेष म्हणजे, नॉकआऊट मॅचमध्ये मेस्सीने पहिल्यांदाचा गोल नोंदवला आहे. मेस्सीने पोर्तुगालचा खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डोलादेखील मागे टाकले आहे. रोनाल्डोने पोर्तुगालकडून खेळताना वर्ल्डकपमध्ये 8 गोल नोंदवले आहेत.

दरम्यान, राऊंड ऑफ 16 मध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटिनाचा सामना नेदरलँडशी होणार आहे. राऊंड ऑफ 16 च्या पहिल्या सामन्यात नेदरलँडने अमेरिकेला पराभूत केले होते. अर्जेंटिना विरूद्ध नेदरलँड सामना 9 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यातील विजेता संघ सेमीफायनलमध्ये जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

SCROLL FOR NEXT