Pele: 'आय ऍम स्ट्राँग!', हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेले यांच्या पोस्टने चाहत्यांना दिलासा

ब्राझीलचे 82 वर्षीय फुटबॉल पेले यांची प्रकृती खालवल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Pele
PeleDainik Gomantak
Published on
Updated on

Pele: ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती गेल्या काहीदिवस चिंताजनक आहे. पण अशातच पेले यांनी ते खंबीर असल्याचे म्हणत चाहत्यांना दिलासा दिला आहे. तसेच ते उपचारांनाही चांगला प्रतिसाद देत आहेत.

पेले (Pele) मंगळवारपासून साओ पावलोमधील अल्बर्ट आईस्टाईन हॉस्पिटलमध्ये ऍडमीट आहेत. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांना कर्करोगाचेही निदान झालेले आहे.

Pele
Pele Hospitalized: ब्राझीलीयन स्टार पेले रुग्णालयात दाखल, कॅन्सरशी झुंज सुरु

पण आता पेले यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट करण्यात आली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की 'मी खूप आशेसह खंबीर आहे. मी माझे उपचारही योग्य प्रकारे घेत आहे. मी संपूर्ण मेडिकल आणि नर्सिंग टीमला माझी काळजी घेण्यासाठी धन्यवाद देऊ इच्छितो.'

'माझा ईश्वरावर विश्वास आहे आणि तुमच्या सर्वांच्या प्रत्येक संदेशामधून मला मिळणाऱ्या प्रेमाने मला ताकद मिळते. ब्राझीललाही वर्ल्डकपमध्ये पाहात आहे.'

सध्या कतारमध्ये फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धा (FIFA World Cup 2022) सुरू आहे. या स्पर्धेत ब्राझीलने (Brazil) बाद फेरीत प्रवेश केला असून 6 डिसेंबर रोजी त्यांचा दक्षिण कोरियाबरोबर उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार आहे.

पेले हे ब्राझीलचेच नाही, तर जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणले जातात. त्यांनी 1958, 1962 आणि 1970 साली ब्राझीलला वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यांनी ब्राझीलसाठी 92 सामन्यांत 77 गोल केले आहेत. त्यांच्यासाठी सध्या जगभरातून प्रार्थना केली जात आहे.

त्यांची गेल्या वर्षभरापासून प्रकृती खाली-वर होत आहे. त्यातही शनिवारी त्यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त समोर आले होते. पण आता त्यांच्याच इंस्टाग्रामवरून पोस्ट करण्यात आली असल्याने सर्वांना थोडा दिलासा मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com