FIFA World Cup 2022 : जर्मनीच्या एक्झिटनंतर कतारमधील टीव्ही प्रेझेंटेटर्सनी उडवली खिल्ली, पाहा Video

फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतून जर्मनी बाहेर पडल्यानंतर कतारमधील टीव्ही होस्ट्सने त्यांची मानवाधिकारांबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल खिल्ली उडवली आहे.
Qatar TV hosts mock Germany team
Qatar TV hosts mock Germany teamDainik Gomantak
Published on
Updated on

FIFA World Cup 2022: कतारमध्ये सध्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत अनेक आश्चर्यकारक निर्णय पाहायला मिळाले. यातील एक म्हणजे 2014 सालच्या वर्ल्डकप विजेत्या जर्मनीचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. पण आता कतारमधील टीव्ही होस्ट्सने त्यांची मानवाधिकारांबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल खिल्ली उडवली आहे.

Qatar TV hosts mock Germany team
Japan vs Spain: जपानचा स्पेनला पराभवाचा धक्का, तर माजी विश्वविजेत्या जर्मनीचीही 'एक्झिट'

झाले असे की जर्मनीने (Germany) या वर्ल्डकपमध्ये (FIFA world Cup 2022) 'वन लव्ह' लिहिलेले आर्म बँड्स घालण्याचे ठरवले होते. ज्यामागे समलिंगी समुदायाला समर्थन देण्याचा हेतू होता. पण फिफाने खेळाडूंना असा बँड घातल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा दिला होता. त्यानंतर खेळाडूंनी हा ब्रँड घातला नाही, पण त्यांनी जपानविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्याआधी तोंडावर हात ठेवत त्यांचा आवाज बंद केला जात असल्याचे दर्शविले होते.

त्यांच्या याच कृतीची आता जर्मनीचा संघाचे आव्हान संपल्यानंतर कतारमधील टीव्ही प्रेझेंटेटरने तोंडावर हात ठेवून आणि गुडबाय करत खिल्ली उडवली होती.

जर्मनीचा फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत ग्रुप इ मध्ये समावेश होता. पण ते त्यांच्या 3 साखळी फेरी सामन्यानंतर 4 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. याच ग्रुपमध्ये असलेल्या स्पेनचेही 4 गुण होते, पण जर्मनीला गोल फरकाचा फटका बसला आणि स्पेन दुसऱ्या व जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

या ग्रुपमध्ये जपानने अखेरच्या साखळी फेरीत स्पेनला पराभूत करत अव्वल स्थान मिळवले आणि बाद फेरीतही प्रवेश केला. जर्मनीसाठी ही स्पर्धा फार खास ठरली नाही. त्यांना एकाच सामन्यात विजय मिळवता आला, तर एक सामना ते पराभूत झाले आणि एका सामन्यात बरोबरी झाली. जर्मनी 2018 मध्येही साखळी फेरीतून बाहेर पडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com