Konkan Shimga 2026 Cricket Prayer Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: "होय रे महाराजा, यंदाचो वर्ल्ड कप भारताच्याच पदरात पाड!" शिमगोत्सवात कोकणवासीयांचे देवासमोर क्रिकेटसाठी साकडं

Konkan Shimga 2026 Cricket Prayer: कोकणात सध्या शिमगोत्सवाची (होळी) धामधूम असून, ग्रामदैवतांच्या पालख्या भेटीचा सोहळा सुरू आहे.

Sameer Amunekar

सिंधुदुर्ग: "अरे देवा महाराजा... या गावच्या पालखीच्या सणानिमित्त जमलेल्या या साऱ्या भक्तांचा रक्षण कर आणि यंदाचा तो 'टी-२० वर्ल्ड कप' काय म्हणतत, तो आपल्या भारताच्याच पदरात पाड रे महाराजा..." अशा शब्दांत कोकणच्या लाल मातीत सध्या देवाला गाऱ्हाणे घातले जात आहे.

कोकणात सध्या शिमगोत्सवाची (होळी) धामधूम असून, ग्रामदैवतांच्या पालख्या भेटीचा सोहळा सुरू आहे. याच सोहळ्यात गुरुवारी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सेमी फायनल सामन्यासाठी कोकणवासीयांनी आपल्या ग्रामदैवताला साकडं घातल्याचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

कोकणात शिमगा म्हणजे श्रद्धेचा आणि उत्साहाचा सर्वोच्च बिंदू. गावागावात पालख्या निघत आहेत, ढोल-ताशांचा गजर सुरू आहे. पण यंदा या उत्साहावर क्रिकेटची सावली पडली आहे. भारतीय संघ टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पोहोचला असून त्यांचा सामना बलाढ्य इंग्लंडशी होणार आहे. भारत हा विश्वचषक जिंकावा, ही इच्छा आता केवळ मैदानापुरती उरली नसून ती देवाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचली आहे.

गाऱ्हाण्याने वेधलं सोशल मीडियाचं लक्ष

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, गावचा 'मानकरी' देवासमोर उभा राहून कोकणी बोलीभाषेत गाऱ्हाणं घालताना दिसत आहे. "होय रे महाराजा... आमचो भारत देश फायनलमध्ये जावू दे आणि यंदाची ट्रॉफी घेऊनच येऊ दे, असा तुझा आशिर्वाद राहू दे," असं म्हणताच उपस्थित भक्तांनी "होय रे महाराजा!" असा एकच जयघोष केला. कोकणी माणसाची ही निरागस श्रद्धा आणि क्रिकेटप्रती असलेलं प्रेम पाहून नेटकरीही या व्हिडिओला पसंती देत आहेत.

भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, खेळाडूंच्या कौशल्यासोबतच नशिबाचीही साथ मिळावी, या भावनेतून कोकणातील देवस्थानं आणि मंदिरांमध्ये प्रार्थना केली जात आहे. मुंबईतून गावी गेलेले चाकरमानीही आपल्या ग्रामदैवताच्या पाया पडताना भारताच्या विजयाचे मागणे मागत आहेत. आता या श्रद्धेला फळ मिळून भारत इंग्लंडला धूळ चारणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT