Team India Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: हार्दिक बाहेर झाल्याने भारताचे उप-कर्णधारपद सांभाळणार 'हा' खेळाडू?

Team India Vice Captain: बीसीसीआयने हार्दिक पंड्या वर्ल्डकपमधून बाहेर झाल्याने उप-कर्णधारपदी एका खेळाडूची निवड देखील केली आहे.

Pranali Kodre

Team India Vice Captain for remainder of ICC ODI Cricker World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. भारताने या स्पर्धेतील सातपैकी सात सामने जिंकून उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. मात्र, असे असतानाच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.

भारतीय संघाचा उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या उर्वरित वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याला डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. दरम्यान, हार्दिक बाहेर गेल्याने आता भारतीय संघव्यवस्थापनेसमोर उपकर्णधारपद कोणाला द्यायचे असा प्रश्न आहे.

तथापि, इंडियन एक्सप्रेसला बीसीसीआयच्या एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार उर्वरित वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी केएल राहुलकडे देण्यात येणार आहे.

सुत्राने सांगितले की 'बीसीसीआयने केएल राहुलला उर्वरित वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार बनवले आहे. त्याला निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकरनी शनिवारी सकाळी याबाबत माहिती दिली आहे.'

या रिपोर्ट्समध्ये पुढे माहिती देण्यात आली आहे की भारताच्या उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळण्यासाठी जसप्रीत बुमराहचाही पर्याय होता. मात्र, केएल राहुल यष्टीरक्षक फलंदाज असल्याने त्याला अधिक पसंती दिली जाते. कारण असे म्हटले जाते की यष्टीरक्षकाला खेळ चांगला समजतो.

त्यामुळे आता केएल राहुल भारतीय संघाच्या सर्व बैठकींमध्ये सामील असेल, तसेच प्लेइंग इलेव्हनच्या निवडीबाबतही मत मांडू शकतो.

हार्दिक पंड्या कसा झाला जखमी?

हार्दिकला वर्ल्डकप 2023 स्पर्धेतच 19 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात पुण्याला झालेल्या सामन्यावेळी डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या सामन्यात त्याच्याच गोलंदाजीवेळी क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. तो अद्याप या दुखापतीतून सावरला नसल्याने आता त्याला या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे.

हार्दिकचा बदली खेळाडू

दरम्यान, उर्वरित वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी हार्दिकचा बदली खेळाडू म्हणून प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. वेगवान गोलंदाज असलेल्या कृष्णाने आत्तापर्यंत 17 वनडे आणि 2 टी20 सामने खेळले आहेत. कृष्णाने वनडेत 29 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी20 क्रिकेटमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

SCROLL FOR NEXT