Rachin Ravindra: आजी-आजोबांच्या गावी रचिनचा जलवा! पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकत मोडला सचिनचा विक्रम

New Zealand vs Pakistan World Cup: न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक करत 5 मोठे विक्रम नावावर केले आहेत.
Rachin Ravindra
Rachin RavindraICC

ICC ODI Cricket World Cup 2023, New Zealand vs Pakistan, Rachin Ravindra Century Record:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी (4 नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात सामना होत आहे. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा 23 वर्षीय खेळाडू रचिन रविंद्रने शतक ठोकत नवे विक्रम रचले आहेत.

रचिनने 94 चेंडूत 108 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 15 चौकार आणि 1 षटकार मारला. हे रचिनचे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील तिसरे शतक आहे. विशेष म्हणजे तो त्याच्या कारकिर्दीतील पहिलाच वर्ल्डकप खेळत आहे.

विशेष म्हणजे रचिन हा मुळचा भारतीय वंशाचा असून त्याचे आजी-आजोबा अद्यापही बंगळुरूमध्ये राहातात. त्याचे वडील मुळचे बंगळुरूचे असून नंतर ते न्यूझीलंडला स्थायिक झाले. त्यामुळे रचिनचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला.

Rachin Ravindra
Rachin Ravindra: 'सचिन आदर्शच, भारताशी नातं असणं...', इंग्लंडविरुद्ध शतकी धमाका करणारा रचिन झाला व्यक्त

सचिनला मागे टाकत विश्वविक्रम केला नावे

रचिनने कारकिर्दीतील पहिल्या वनडे वर्ल्डकपमध्ये तीन शतके करणारा पहिला क्रिकेटपटू होण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. यापूर्वी कोणालाही पहिल्याच वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 3 शतके करता आली नव्हती.

त्याचबरोबर वयाची 25 वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच वर्ल्डकपमध्ये 3 शतके करणाराही तो पहिलाच क्रिकेटपटू आहे. त्याने वयाची 25 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाला मागे टाकले आहे. सचिनने 25 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी वर्ल्डकपमझ्ये 2 शतके केली होती.

रचिनच्या ५०० धावा

दरम्यान, रचिनने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 8 सामन्यात तीन शतकांसह 523 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने वयाची 25 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी एका वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही अव्वल क्रमांकावर असलेल्या सचिनची बरोबरी केली आहे. सचिनने 1996 मध्ये वयाची 25 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी 523 धावा केल्या होत्या.

Rachin Ravindra
World Cup 2023: हार्दिक स्पर्धेतून बाहेर! सेमीफायनलमध्ये पोहचलेल्या टीम इंडियात 'या' बॉलरची वर्णी

याशिवाय रचिन एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात कमी वयात 500 धावा पूर्ण करणारा दुसऱ्या क्रमांकाचा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचे शनिवारी 23 वर्षे 351 दिवस वय होते. या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. त्याने 22 वर्षे 324 दिवस वय असताना 1996 वर्ल्डकपमध्ये असा कारनामा केला होता.

न्यूझीलंडसाठीही मोठा विक्रम

रचिन न्यूझीलंडकडूनही एकाच वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ३ शतके करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी ग्लेन टर्नर, मार्टिन गप्टील आणि केन विलियम्सन यांनी एका वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी २ शतके केली होती. टर्नर यांनी 1975 साली, गप्टीलने 2015 साली आणि विलियम्सनने 2019 साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये २ शतके केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com