KL Rahul & Rohit Sharma
KL Rahul & Rohit Sharma  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: सुनिल अण्णाचा जावाई बनणार रोहितचा ओपनिंग पार्टनर! AUS कॅम्पमध्ये...

दैनिक गोमन्तक

India vs Australia Test Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे काउंटडाऊन सुरु झाले आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे.

या मालिकेत युवा फलंदाज शुभमन गिलही टीम इंडियाचा एक भाग आहे. परंतु शुभमन गिलला या मालिकेत सलामीवीर म्हणून खेळणे अवघड वाटत आहे. त्याच्या जागी एक धडाकेबाज फलंदाज कर्णधार रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार बनू शकतो.

शुभमन गिल नाही, हा खेळाडू ओपन करेल

शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, पण या कसोटी मालिकेत केएल राहुल देखील टीम इंडियाचा एक भाग आहे. गेल्या काही काळापासून केएल राहुल आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे सलामीवीर म्हणून टीम इंडियाची पहिली पसंती राहिले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा हा लेफ्टी फलंदाज ऑस्ट्रेलिया मालिकेत डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. केएल राहुल कसोटीत भारतीय संघाचा उपकर्णधारही आहे.

गिल या ठिकाणी संधी मिळू शकते

टीम इंडियाचा (Team India) धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत मधल्या फळीत शुभमन गिलला पसंती मिळू शकते. गिलने कसोटी क्रिकेटमध्ये बहुतांश संघासाठी डावाची सुरुवात केली आहे, परंतु यावेळी तो मधल्या फळीतही फलंदाजी करताना दिसू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

Valpoi Old Bridge : सावर्डे जुना पूल होणार कालबाह्य : विश्वजीत राणे

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT