Kieron Pollard Mumbai Indians
क्रीडा

Kieron Pollard: राशीदच्या जागेवर पोलार्ड मुंबई इंडियन्सच्या 'या' संघाचा कर्णधार! द. आफ्रिकेत करणार नेतृत्व

Mumbai Indians: कायरन पोलार्ड आता दक्षिण आफ्रिकेत मुंबई इंडियन्सच्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

Pranali Kodre

Kieron Pollard replaces injured Rashid Khan as captain of Mumbai Indians Cape Town in SA20:

दक्षिण आफ्रिकेमध्ये १० जानेवारीपासून SA20 ही लीग चालू होणार आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सची मालकी असलेला एमआय केपटाऊन हा संघही खेळतो. दरम्यान नव्या हंगामात एमआय केपटाऊन संघाचे नेतृत्व कायरन पोलार्ड करणार आहे.

एमआय केपटाऊनने रविवारी पोलार्डकडे नेतृत्व सोपवल्याचे जाहीर केले. एमआय केपटाऊनने यापूर्वी फिरकीपटू राशीद खानला कर्णधार केले होते. पण काही दिवसांपूर्वीच राशीदच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली असून त्यातून तो सध्या बाहेर येत आहे.

त्यामुळे तो या स्पर्धेत खेळण्यासाठी अनुपलब्ध आहे. त्याचमुळे राशीदच्या जागेवर पोलार्डला या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.

एमआय केपटाऊनकडून सांगण्यात आले आहे की, 'राशिद खान सध्या अनुपलुब्ध आहे. त्यामुळे तो सध्या दुखापतीतून बाहेर येत आहे. एमआय केपटाऊनकडून राशिदला लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा. आम्ही तो लवकरच मैदानात परतण्याची प्रतिक्षा करत आहोत.'

अफगाणिस्तान संघात राशिदचा समावेश

दरम्यान, भारताविरुद्ध 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी अफगाणिस्तानच्या संघात राशीदचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. त्याचमुळे इब्राहिम झाद्रानकडे प्रभारी कर्णधार करण्यात आले आहे.

पोलार्ड मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा भाग

पोलार्ड आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून जवळपास एक दशक खेळला. सध्या तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षकपण आहे. याशिवाय  ILT20 स्पर्धेत एमआय इमिरेट्स, तसेच मेजर लीग क्रिकेट स्पर्धेतही एमआय न्यूयॉर्क या संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT