India vs England | Kevin Pietersen  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: 'टीम इंडियाला भारतात हरवणं अगदी सोपं, पण...'; इंग्लंडच्या दारुण पराभवानंतर पीटरसनची पोस्ट व्हायरल

Kevin Pietersen Post: भारताने इंग्लंडला कसोटी मालिकेत पराभूत करत मायदेशात सलग 17 वी कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केल्यानंतर केविन पीटरसनने उपहासात्मक ट्वीट केले आहे.

Pranali Kodre

Kevin Pietersen Post after India beat England 4-1 in Test Series

भारत आणि इंग्लंड संघात नुकतीच कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत भारताने 4-1 अशा फरकाने विजय मिळवला. विशेष म्हणजे या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने पराभूत झाला होता. मात्र, नंतर पुनरागमन करत भारताने पुढील चारही सामने जिंकले.

भारताचा हा मायदेशातील सलग 17वा कसोटी मालिका विजय आहे. भारतीय संघ मायदेशात गेल्या 12 वर्षात कसोटी मालिकेत अपराजीत राहिला आहे. भारताला मायदेशात अखेरच्यावेळी कसोटी मालिकेत 2012 साली इंग्लंडनेच पराभूत केले होते.

परंतु, नंतर आत्तापर्यंत एकदाही भारतीय संघ कसोटी मालिकेत पराभूत झालेला नाही. याबद्दल केविन पीटरसनने उपहासात्मक ट्वीट केले आहे. त्याने भारतीय संघाला भारतात पराभूत करण्यात अपयश आलेल्या सर्वच संघांना त्याच्या ट्वीटमधून टोमणा मारला आहे.

त्याने म्हटले आहे की त्याच्यासाठी भारतीय दौरा हा सर्वात सोपा होता. खरंतर भारतीय संघाला 2012 साली भारतात पराभूत करणाऱ्या इंग्लंड संघात केविन पीटरसनचाही समावेश होता. त्यानेही या मालिकेत शानदार कामगिरी केली होती.

पीटरसनने इंग्लंडच्या पराभवानंतर पोस्ट केले की 'भारतीय संघाला भारतात पराभूत करणे संघांना इतके कठीण जाते, हे मला जरा विचित्र वाटते. आम्हाला काहीही समस्या जाणवली नव्हती. आम्ही केलेल्या सर्वात सोप्या दौऱ्यापैकी तो दौरा होता.'

साल 2012 मध्ये इंग्लंडने केलेल्या भारत दौऱ्यात अमदाबादला झालेला पहिला कसोटी सामना पराभूत झाला होता. पण नंतर इंग्लंडने मुंबईला झालेल्या दुसऱ्या सामन्यात 10 विकेट्सने विजय मिळवत पुनरागमन केले, तसेच कोलकाताला झालेला तिसरा सामनाही इंग्लंडने जिंकला होता.

चौथा आणि अखेरचा कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे ही मालिका इंग्लंडने ऍलिस्टर कूकच्या नेतृत्वात 2-1 अशा फरकाने जिंकली होती.

या मालिकेत कूकनेच मालिकावीप पुरस्कारही जिंकला होता. त्याने या मालिकेत 3 शतके केली होती. तसेच केविन पीटरसननेही या मालिकेत 4 सामन्यांत 2 शतकांसह 48.28 च्या सरासरीने 338 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT