football tournament
football tournament Dainik Gomantak
क्रीडा

केरळा ब्लास्टर्सने फुटबॉल स्पर्धेत राखली विजयी घोडदौड

दैनिक गोमन्तक

पणजी: निहाल सुदीश याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर केरळा ब्लास्टर्सने रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत विजयी घोडदौड राखली. त्यांनी सलग चौथा सामना जिंकताना बुधवारी जमशेदपूर एफसीला 2-0 फरकाने हरविले. (Kerala Blasters maintained their winning streak in the football tournament )

बाणावली येथे झालेल्या सामन्यात निहाल याने पहिला गोल 27, तर दुसरा गोल 84 व्या मिनिटास केला. ओळीने चौथा सामना जिंकल्यामुळे केरळा ब्लास्टर्सचे आता स्पर्धेत सर्वाधिक 12 गुण झाले आहेत. त्यांनी चारही सामन्यात एकही गोल न स्वीकारण्याचा पराक्रम केला. जमशेदपूर एफसीचा हा स्पर्धेतील पहिला पराभव ठरला. त्यामुळे त्यांचे सात गुण कायम राहिले.

नागोवा येथील मैदानावर बुधवारी झालेल्या लढतीत आरएफ यंग चँप्स संघाने चेन्नईयीन एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखले. त्यामुळे चार लढतीनंतर यंग चँप्स संघाचे चार गुण झाले. स्पर्धेत अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या चेन्नईची ही दुसरी बरोबरी ठरली. त्यामुळे चार लढतीनंतर त्यांचे दोन गुण कायम राहिले.

एफसी गोवासमोर हैदराबादचे आव्हान

डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी (ता. 28 ) एफसी गोवासमोर हैदराबाद एफसीचे आव्हान असेल. सामना बाणावली येथे खेळला जाईल. सध्या प्रत्येकी तीन लढतीनंतर हैदराबाद व एफसी गोवाचे प्रत्येकी तीन गुण आहेत. नागोवा येथे बंगळूर एफसी व मुंबई सिटी यांच्यात सामना होईल. सलग तीन सामने जिंकलेल्या बंगळूरचे नऊ गुण असून मुंबई सिटीला तिन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Nepal: नेपाळनेही एव्हरेस्ट, MDH मसाल्यावर घातली बंदी; धोकादायक केमिकलबाबत केली कारवाई

Ponda News : दारूच्या नशेत पर्यटकांची दादागिरी; दाभाळ येथील प्रकार

SCROLL FOR NEXT