Kapil Dev  Dainik Gomantak
क्रीडा

Team India: 40 वर्षांपूर्वी 'याच' दिवशी रचला होता इतिहास, भारतीय दिगग्ज खेळाडूने...!

Indian Cricket: टीम इंडियाचे नेतृत्व महान खेळाडू 'कपिल देव' यांनी केले होते. आम्ही तुम्हाला देव यांच्या त्या ऐतिहासिक खेळीबद्दल सांगत आहोत.

Manish Jadhav

Kapil Dev 175 Not Out: भारतात क्रिकेटचे पूजन केले जाते. टीम इंडिया एखादा सामना हारली तर चाहत्यांना अश्रू अनावार होतात. यातच, यावर्षी टीम इंडिया विश्वचषक खेळणार आहे, परंतु आम्ही तुम्हाला 40 वर्षांपूर्वी म्हणजे 1983 मध्ये परत घेऊन जात आहोत.

जिथे भारताच्या एका दिग्गज फलंदाजाने खतरनाक खेळी खेळली होती. त्यावेळी टीम इंडियाचे नेतृत्व महान खेळाडू 'कपिल देव' यांनी केले होते. आम्ही तुम्हाला देव यांच्या त्या ऐतिहासिक खेळीबद्दल सांगत आहोत.

1983 चा तो अविस्मरणीय सामना

दरम्यान, 1983 च्या विश्वचषकात कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने विजेतेपद पटकावले आणि जगाला दाखवून दिले की, भारतही कोणापेक्षा कमी नाही.

दुसरीकडे, आजच्याच दिवशी भारत (India) आणि झिम्बाब्वे यांच्यात अविस्मरणीय सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारताच्या विजयाच्या आशा नगण्य वाटत होत्या.

मात्र, भारताचे दिग्गज फलंदाज कपिल देव यांनी चमत्कार दाखवत अशी ऐतिहासिक खेळी खेळली, जी आजही क्रिकेट इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली आहे. या खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेचा पराभव केला होता.

कर्णधाराने ऐतिहासिक खेळी खेळली

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात विश्वचषकातील 20 वा सामना खेळला जात होता. त्यावेळी क्रिकेटमध्ये 60 षटकांचा खेळ असायचा. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील हा सामना त्यावेळी ट्यूनब्रिजच्या मैदानावर खेळला गेला होता.

या सामन्यात कर्णधार कपिल देव यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने (Team India) 17 धावांत आपल्या पाच विकेट गमावल्या होत्या. सुनील गावसकर (0), क्रिस श्रीकांत (0), मोहिंदर अमरनाथ (5), संदीप पाटील (1) आणि यशपाल शर्मा (9) हे दिग्गज पॅव्हेलियनमध्ये परतले होते.

संघाची दयनीय अवस्था पाहता हा सामना ते हरतील असेच वाटत होते. परंतु नियतीला ते मंजूर नव्हते. कपिल देव फलंदाजीला आले. त्यांची बॅट शतकानुशतके स्मरणात राहील अशा पद्धतीने काम करेल असे कोणालाच वाटले नसेल.

कपिल देव यांनी 138 चेंडूत नाबाद 175 धावा काढल्या. हे त्यांचे पहिले शतक होते. या खेळीत त्यांनी 16 चौकार आणि 6 षटकार मारला होता.

देव यांनी संघाला कठीण परिस्थितीतून तर बाहेर काढलेच, पण 266 धावांच्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले होते.

भारताने विश्वचषक जिंकला होता

भारताच्या 267 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 235 धावांवरच गारद झाला. 1983 मध्येच भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला होता.

याशिवाय, महेंद्रसिंग धोनी हा एकमेव कर्णधार आहे, जो भारताला विश्वचषक जिंकून देण्यात यशस्वी ठरला आहे. धोनीने 2007 मध्ये T20 विश्वचषक आणि 28 वर्षांनी 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला.

2011 पासून टीम इंडियाने अद्याप विश्वचषक जिंकलेला नाही. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विश्वचषकात भारत आणखी एक ट्रॉफी जिंकेल, अशी आशा चाहत्यांना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

SCROLL FOR NEXT