Indian women's team tour of Bangladesh for ODI and T20 Series reports: भारतीय पुरुष संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. याशिवाय भारतीय महिला संघ देखील जुलैच्या सुरुवातीला बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघाला मर्यादीत षटकांच्या मालिका खेळायच्या आहेत.
भारतीय महिला संघाच्या बांगलादेश दौऱ्याबाबत क्रिकबजला बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या महिला विंगच्या अध्यश्रा शफिउल आलम चौधरी नादेल यांनी पुष्टी दिली आहे.
नादेल यांनी सांगितले की 'हो आम्ही भारतीय महिला राष्ट्रीय संघाविरुद्ध जुलैमध्ये मर्यादीत षटकांच्या मालिका खेळणार आहे. सर्व सामने शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.'
त्यामुळे आता तब्बल 11 वर्षांनी शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर महिलांचा आंतरराष्ट्रीय सामना पहाता येणार आहे. अखेरच्या वेळी बांगलादेशच्या महिला संघाने 2012 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध सामना खेळला होता.
सध्या समोर आलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार टी२० मालिकेतील तीन सामने अनुक्रमे 9, 11 आणि 13 जुलै रोजी खेळले जातील. त्यानंतर वनडे मालिकेतील तीन सामने 16, 19 आणि 22 जुलै रोजी खेळले जातील.
दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या मालिकांबद्दल अद्याप दोन्ही बोर्डकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तब्बल चार महिन्यांनी भारतीय महिला संघ आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसणार आहे. यापूर्वी 23 फेब्रुवारी 2023 रोजी महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध खेळला होता. हा टी20 वर्ल्डकपमधील उपांत्य सामना होता. या सामन्यात भारतीय महिला संघाला 5 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्यानंतर गेल्या चार महिन्यात भारतीय महिला संघाने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. दरम्यान, भारतीय महिला संघातील खेळाडू मार्चमध्ये पार पडलेल्या पहिल्या वूमन्स प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.