Jemimah Rodrigues praises Sajana Sajeevan
Jemimah Rodrigues praises Sajana Sajeevan Dainik Gomantak
क्रीडा

WPL: 'तिनं केरळ महापुरात सर्व गमावलं...' मुंबई इंडियन्सच्या विजयाची शिल्पकार Sajana Sajeevan चे जेमिमाहकडून विशेष कौतुक

Pranali Kodre

Jemimah Rodrigues praises Sajana Sajeevan:

वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला शुक्रवारी (23 फेब्रुवारी) दणक्यात सुरुवात झाली. या हंगामात पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला.

या सामन्यात मुंबईने अखेरच्या चेंडूवर 4 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. मुंबईच्या या विजयाची शिल्पकार ठरली ती 19 वर्षीय सजना सजीवन.

या सामन्यात दिल्लीने दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती. या चेंडूच्या आधीच्याच चेंडूवर मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर 55 धावांवर बाद झाली होती.

पण असे असतानाही दबाव हाताळत सजनाने अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार मारला आणि मुंबईच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोष केला. त्यानंतर क्रिकेट वर्तुळात सजनाबद्दल चर्चा सुरू झाली.

विशेष म्हणजे अष्टपैलू सजनाचा हा डब्लुपीएलमधील पहिलाच सामना होता. गेल्यावर्षीच्या लिलावात ती अनसोल्ड राहिली होती. परंतु, तिला यंदाच्या हंगामासाठी मुंबईने संघात घेतले होते. तिनेही हा विश्वास सार्थ ठरवत पहिल्याच सामन्यात तिच्यातील क्षमतेची चुणूक दाखवली.

दरम्यान, तिच्या या कामगिरीचे कौतुक दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारी भारताची स्टार क्रिकेटपटू जेमिमाह रोड्रिग्जनेही केले. जेमिमाहने केवळ तिचे कौतुकच केले नाही, तर तिच्या संघर्षाबद्दलही सांगितले आहे.

केरळकडून क्रिकेट खेळणाऱ्या सजनाचा प्रवास अनेक खडतर अडचणींनी भरलेला आहे. त्यातही तिच्यावर 2018 साली मोठे आभाळ कोसळले, ते केरळमध्ये आलेल्या पूरामुळे.

याबद्दल जेमिमाने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की 'आम्हाला अपेक्षित निकाल मिळाला नाही. पण पदार्पण करणाऱ्या सज्जूने ज्याप्रकारे शेवट केला, ते शानदार होते.'

'ती एका सामान्य कुटुंबातून आली, केरळमध्ये आलेल्या पूरात तिने सर्वकाही गमावले होते आणि त्यानंतर आता ती तिच्या संघाला एका चेंडूत 5 धावांची गरज असताना मैदानात आली आणि सहज षटकार मारला. तिची काय कहाणी आहे आणि त्यापेक्षाही ती खेळाडू म्हणून कमाल आहे.'

सजना गेल्या काही वर्षापासून क्रिकेट खेळत असून तिने वयोगटातील क्रिकेटपासून केरळचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने 23 वर्षांखालील केरळच्या महिला संघाचे नेतृत्व करताना टी20 सुपर लीगचे विजेतेपदही जिंकले होते.

विशेष म्हणजे तिने वयाच्या 17 व्या वर्षी गांभीर्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने झपाट्याने प्रगती करत साधारण 19 व्या वर्षापर्यंत केरळ संघात स्थानही मिळवले. तिला केरळ संघाचे नेतृत्वही मिळाले. तसेच तिने केलेल्या कामगिरीमुळे तिने भारतीय महिला अ संघातही स्थान मिळवले आहे.

गंभीरने दिलेली बॅट भेट

दरम्यान 2016 मध्ये एका रणजी ट्रॉफीतील राजस्थान विरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीकडून खेळणारा गंभीर वायनाडला आला होता. त्यावेळी त्याने सजनाला एक बॅट भेट दिली होती. विशेष म्हणजे त्या बॅटने तिने खूप क्रिकेटही खेळताना अनेक चांगल्या खेळी केल्या.

सजनाला सचिन तेंडुलकरने क्रिकेटची प्रेरणा दिली असून ती मिताली राज आणि हरमनप्रीत कौरलाही आदर्श मानत असलेल्याचे तिने एकदा फिमेल क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. तसेच ती एमएस धोनी, ब्रेंडन मॅक्युलम, मायकल हसी आणि ऍडम गिलख्रिस्टचीही चाहती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT