Jemimah Rodrigues  Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: 'चिकनी चमेली'वर जेमिमाह रोड्रिग्जसह थिरकले दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू, Video Viral

दिल्ली कॅपिटल्सच्या महिला संघातील स्टार फलंदाज जेमिमाह रोड्रिग्जने तिच्यासह तिच्या संघसहकारी 'चिकनी चमेली'वर डान्स करत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Pranali Kodre

Jemimah Rodrigues Dance on Chikni Chameli: भारतात सध्या वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत विविध देशातील खेळाडू एकत्र येऊन मैदानात शानदार कामगिरी करण्याबरोबरच रिकाम्या वेळेत मजामस्ती करतानाही दिसत आहेत. नुकतेच दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील खेळाडूंच्या मस्तीचे व्हिडिओ समोर आले आहेत.

दिल्ली कॅपिटल्सची युवा फलंदाज जेमिमाह रोड्रिग्जने तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये तिच्यासह दिल्ली कॅपिटल्स संघातील तिच्या संघसहकारी गाणी म्हणताना आणि डान्स करतानाही दिसत आहेत.

यातील एका व्हिडिओमध्ये जेमिमाह संघसहकाऱ्यांसह 'चिकनी चमेली', या बॉलिवूड गाण्यावरही डान्स करताना दिसत आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओंवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या असून हे व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस देखील उतरत आहेत.

रोड्रिग्जने हे व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की 'दिल्ली कॅपिटल्सच्या कुटुंबासह थोडे कराओके आणि डान्सिंग.'

दरम्यान, जेमिमाहच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास तिने आत्तापर्यंत दिल्लीकडून चांगली कामगिरी केली आहे. तिने 5 सामन्यांतील 4 डावात 56.50 च्या सरासरीने 113 धावा केल्या आहेत.

तसेच दिल्ली कॅपिटल्सनेही आत्तापर्यंत दमदार कामगिरी केली असून संघाची कर्णधार मेग लेनिंग सध्या या हंगामात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू देखील आहे. तिने 5 सामन्यांमध्ये 55.25 च्या सरासरीने 2 अर्धशतकांसह 221 धावा केल्या आहेत.

तसेच दिल्ली कॅपिटल्स संघही प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या उंबरठ्यावर आहे. दिल्लीने आत्तापर्यंत 5 सामन्यांमध्ये चार विजय मिळवले आहेत आणि एक पराभव स्विकारला आहे. त्यांनी अजून एक विजय मिळवल्यास हे प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.

जेमिमाह एंटरटेनमेंट पॅकेज

जेमिमाहने चाहत्यांचे मनोरंजन करणे तसे नवीन नाही. ती यापूर्वी अनेकदा तिच्या वेगवेगळ्या व्हिडिओमधून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. अनेकदा तिचे गिटार वाजवतानाचे, गाणे म्हणतानाचे किंवा डान्स करतानाचेही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तसेच अनेकदा ती संघसहकाऱ्यांबरोबर मस्ती करतानाही दिसली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT