WPL 2023: सुपरवूमन जेमिमाह! हवेत सूर मारत पडकला अविश्वसनीय कॅच, पाहा Video

DC vs MI: जेमिमाहने मुंबईची सलामीवीर हेली मॅथ्यूजला हवेत सूर मारत शानदार झेल घेतला.
Jemimah Rodrigues
Jemimah Rodrigues Dainik Gomantak
Published on
Updated on

Jemimah Rodrigues took super catch: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सातवा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 8 विकेट्सने विजय मिळवला. पण असे असले तरी, या सामन्यात दिल्लीकडून जेमिमाह रोड्रिग्जने घेतलेल्या झेलाने सर्वांचेच लक्ष वेधले.

या सामन्यात दिल्लीने दिलेल्या 106 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर हेली मॅथ्यूज चांगला खेळ करत होती. पण 12 व्या षटकात तिने एलिस कॅप्सीविरुद्ध एक मोठा शॉट खेळला. पण तिच्या या शॉटवर चेंडू सीमा पार करू शकला नाही. उलट, जेमिमाहने तो चेंडू शानदार सूर मारत झेलला.

Jemimah Rodrigues
WPL 2023, DC vs MI: तीन विकेट्स घेत सायका इशाक ठरली 'प्लेअर ऑफ द मॅच'

झाले असे की जेव्हा चेंडू उंच हवेत उडाला तेव्हा जेमिमाहने पळत येत तिच्या समोर सूर मारला आणि तो चेंडू लाँग ऑफला झेलला. तिने घेतलेला हा शानदार झेल पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले. मात्र, तिच्या या सुरेख झेलामुळे मॅथ्यूजला 32 धावांवर माघारी परतावे लागले.

दरम्यान, ती जरी बाद झाली, तरी नॅट स्किव्हर आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी संघ सहज विजय मिळवेल याची काळजी घेतली. या दोघींनी नाबाद राहात मुंबईला 15 षटकात 106 धावांचे आव्हान पार करून दिले. स्किव्हरने नाबाद 23 धावा केल्या, तर हरमनप्रीतने नाबाद 11 धावा केल्या. त्याआधी सलामीवीर यास्तिका भाटीयाने 41 धावांची खेळी केली. दिल्लीकडून तारा नॉरिस आणि एलिस कॅप्सी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Jemimah Rodrigues
Gujarat Giants टीमला तगडा झटका! कॅप्टनच WPL 2023 मधून बाहेर, आता 'ही' खेळाडू घेणार जागा

तत्पूर्वी दिल्लीचा प्रथम फलंदाजी करताना 18 षटकातच 105 धावांवर सर्वबाद झाला होता. दिल्लीकडून कर्णधार मेग लेनिंगने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली, तसेच जेमिमाहने 25 धावा केल्या. या दोघींव्यतिरिक्त केवळ राधा यादवला दोन आकडी धावसंख्या पार करता आली. तिने 10 धावा केल्या. पण अन्य फलंदाज झटपट बाद झाल्या.

मुंबईकडून सायका इशाक, इझी वाँग आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच पुजा वस्त्राकरने एक विकेट घेतली. दरम्यान, सायका या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली. तिने 3 षटकात 13 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com