WPL 2023: किंग कोहलीचा मेसेज अन् RCB चा पहिला विजय! असं काय सांगितलं होतं ऐकाच

RCB vs UPW सामन्यापूर्वी विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या महिला संघाशी संवाद साधला होता.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak

Royal Challengers Bangalore: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धा सध्या सुरू असून नुकताच बुधवारी (15 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने या स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. त्यांनी युपी वॉरियर्स संघाला 5 विकेट्सने पराभूत केले. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या सहा सामन्यातील हा आरसीबीचा पहिलाच विजय ठरला. त्यांना या सामन्यापूर्वी सलग पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, या सामन्याच्या आधी आरसीबीच्या पुरुष संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने महिला संघाची संवाद साधला होता. या संवादाचा व्हिडिओ आरसीबीच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की विराट त्याचा आयपीएलमधील अनुभव सांगत आहे. विराट गेली 15 वर्षे आरसीबीकडून खेळत असून एकदाही त्याने विजेतेपद पटकावलेले नाही. याबद्दलही विराटने भाष्य केले आहे.

Virat Kohli
IPL 2023 मध्ये 'हा' गोलंदाज चमकणार! नंबर-1 दिग्गज खेळाडूचा मोडणार रेकॉर्ड?

विराट कोहली म्हणाला, 'मी गेली 15 वर्षे आयपीएल खेळत आहे आणि मी अजूनही विजेतेपद जिंकलेलो नाही. पण त्याने काही माझे प्रत्येक वर्षी उत्साहाने खेळणे थांबवले नाही. हे मी करू शकतो. मी माझे योगदान प्रत्येक स्पर्धेतील प्रत्येत सामन्यात देऊ शकतो.'

'जर आपण जिंकलो, तर छान. जर आपण नाही जिंकलो, तर मी याचे दु:ख करत बसत नाही, की जर मी आयपीएल जिंकलो असतो तर. नाहीतर मी आनंदी राहू शकलो नसतो. त्यामुळे आता किती वाईट परिस्थितीत आहे, यापेक्षा तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीचा विचार करा. कारण प्रत्येक गोष्टीला नेहमीच दुसरी बाजू असते आणि ती यापेक्षाही वाईट असू शकते.'

'खरं म्हणजे आपण जरी आयपीएल जिंकलेलो नसलो, तरी मला असे वाटते की आपल्या संघाला जगातील सर्वोत्तम चाहते मिळाले आहेत. कारण आरसीबीसाठी प्रत्येक सामना खेळताना आपण वचनबद्ध राहातो आणि हीच आपल्या चाहत्यांसाठी खास गोष्ट आहे. प्रत्येक वर्षी कप जिंकू ही खात्री नसते, पण प्रत्येक वर्षी 110 टक्के योगदानाची तुम्ही खात्री देऊ शकता.'

Virat Kohli
IPL 2023 चा हंगाम सुरु होण्यापूर्वीच RCB ला मोठा झटका, 'हा' स्टार अष्टपैलू खेळाडू...

दरम्यान, युपी वॉरियर्स विरुद्ध आरसीबीने मिळवलेल्या विजयात अष्टपैलू कनिका अहुजाने महत्त्वाचा वाटा उचलला. तिने 30 चेंडूत महत्त्वपूर्ण 46 धावांची खेळी केली. तिला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून देखील निवडण्यात आले.

यानंतर तिनेही सांगितले की विराटने तिला प्रेरणा दिली. ती म्हणाली, 'विराट सरांनी सांगितले की इथे दबाव घेण्यासारखे काही नसते. इथे खेळाची मजा घ्यायची असते. कारण आपल्याला इथे खेळायची संधी मिळाली आहे, अशी संधी प्रत्येकाला मिळत नसते.'

या सामन्यात युपी वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 135 धावा केल्या होत्या. त्यानंतर बेंगलोरने 18 षटकात 5 विकेट्स गमावत 136 धावांचे आव्हान पूर्ण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com