Jamshedpur FC Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: जमशेदपूर एफसी ने उपांत्य फेरीत मारली धडक

सामन्यातील शेवटची 22 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळूनही जमशेदपूर एफसीने (Jamshedpur FC) हैदराबाद एफसीचा 3-0 फरकाने धुव्वा उडविला.

किशोर पेटकर

पणजी: सामन्यातील शेवटची 22 मिनिटे दहा खेळाडूंसह खेळूनही जमशेदपूर एफसीने (Jamshedpur FC) हैदराबाद एफसीचा (Hyderabad FC) 3-0 फरकाने धुव्वा उडविला आणि आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रथमच प्रवेश केला. सलग पाचव्यासह विजयासह त्यांनी अव्वल स्थानही मिळविले. (Jamshedpur FC Defeated Hyderabad FC In The Indian Super League Football Tournament)

दरम्यान, हैदराबादने अगोदरच स्पर्धेची प्ले-ऑफ फेरी निश्चित केली आहे. जमशेदपूरने मंगळवारी बांबोळी येथील अॅथलेटिक स्टेडियमवर पूर्ण वर्चस्व राखले. पूर्वार्धात पाचव्या मिनिटास चिंग्लेनसाना सिंग याच्या स्वयंगोलमुळे जमशेदपूरला आघाडी मिळाली, कर्णधार इंग्लंडचा पीटर हार्टली याच्या भेदक हेडरमुळे त्यांची आघाडी 28व्या मिनिटास वाढली. 65व्या मिनिटास नायजेरियन डॅनियल चिमा चुक्वू याने आघाडी 3-0 अशी मजबूत केली.

तसेच, तिन्ही गोलमध्ये ब्राझीलियन मध्यरक्षक अॅलेक्झांडर लिमा याचा वाटा राहिला. पहिल्या दोन गोलवेळी त्याने कॉर्नर फटका मारला, तर तिसऱ्या गोलसाठी त्याचा पास निर्णायक ठरला. तोच सामन्याचा मानकरी ठरला. सामन्याच्या 68व्या मिनिटास मोबाशिर रेहमान याला धोकादायक खेळाबद्दल थेट रेड कार्ड दाखविण्यात आले, त्यामुळे जमशेदपूरचे सामर्थ्य दहा खेळाडूंवर आले.

याशिवाय, आयएसएल स्पर्धेत पाचवा मोसम खेळणाऱ्या जमशेदपूरने प्रथमच प्ले-ऑफ फेरी गाठली. 18 लढतीतील त्यांचा हा एकंदरीत अकरावा विजय ठरला. त्यांचे आता सर्वाधिक 37 गुण झाले आहेत. हैदराबादला चौथा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे ते 19 लढतीनंतर 35 गुणांसह दुसऱ्या स्थानी घसरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT