Indian Super League: केरळा ब्लास्टर्सचे आव्हान कायम

केरळा ब्लास्टर्सचे आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेतील आव्हान कायम राहिले.

Jorge Pereira Diaz
Jorge Pereira DiazDainik Gomantak

पणजी: शिस्तभंग कारवाईचे निलंबन संपवून संघात परतलेल्या जॉर्जे परेरा डायझ याने तीन मिनिटांत केलेल्या दोन गोलमुळे केरळा ब्लास्टर्सचे आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेतील आव्हान कायम राहिले. सामना 0 3 फरकाने गमावल्यामुळे दोन वेळचा माजी विजेता चेन्नईयीन एफसी संघ साखळी फेरीतच गारद झाला. (Kerala Blasters beat Chennaiyin FC)

सामना शनिवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. अर्जेंटिनाच्या परेरा याने अनुक्रमे 52 व 55व्या मिनिटास गोल केल्यामुळे केरळा ब्लास्टर्सला (Kerala Blasters) स्पर्धेतील आठवा विजय नोंदविता आला. परेराने आता स्पर्धेत सहा गोल केले आहेत. उरुग्वेच्या ॲड्रियन याने 90व्या मिनिटास गोल नोंदवून माजी उपविजेत्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याचा हा मोसमातील पाचवा गोल ठरला.केरळा ब्लास्टर्सने आता 18 लढतीतून 3-0 गुण झाले आहेत. त्यांना चौथा क्रमांक मिळाला. आणखी दोन सामने बाकी असल्यामुळे त्यांना उपांत्य फेरीची संधी आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही ‘सदर्न डर्बी’तील लढतीतही केरळा ब्लास्टर्सने 3-0 फरकाने बाजी मारली होती. चेन्नईयीनला (Chennaiyin FC) 19 लढतीत नववा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे 20 गुण आणि आठवा क्रमांक कायम राहिला. त्यांच्यासाठी शेवटचा सामना औपचारिकता असेल.


Jorge Pereira Diaz
Indian Super League: मुंबई सिटी ने मारली 'टॉप फोर' मध्ये धडक

यशस्वी पुनरागमन

परेरा याला 19 फेब्रुवारी रोजी एटीके मोहन बागानविरुद्धच्या लढतीत रेड कार्ड दाखविण्यात आले होते. त्याच्या मैदानावरील असभ्य वर्तनामुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या शिस्तपालन समितीने या 31 वर्षीय आघाडीपटूस कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. परेराने माफीनामा सादर केल्यामुळे त्याच्यावर पुढील कारवाई झाली नाही, तसेच रेड कार्डचे निलंबन एका सामन्यापुरती मर्यादित राहिले. त्याने शनिवारी वास्कोत शानदार पुनरागमन केले. विश्रांतीनंतरच्या दहाव्या मिनिटास ॲड्रियन लुना याच्या असिस्टवर परेराने अचूक नेम साधत गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. तीन मिनिटांनंतर रिबाऊंडवर त्याने संधी साधली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com