Indian Super League: बरोबरीमुळे शेवटच्या क्रमांकाची चुरस कायम

Indian Super League: ईस्ट बंगालने पिछाडीवरून नॉर्थईस्ट युनायटेडला 1-1 असे रोखले
Indian Super League
Indian Super Leaguedainikgomantak
Published on: 
Updated on: 

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात गुणतक्त्यातील शेवटच्या संघाची उत्सुकता कायम राहिली. नॉर्थईस्ट युनायटेड व ईस्ट बंगाल या तळातील संघांत सोमवारी 1-1 अशी गोलबरोबरी झाल्यामुळे कोणता संघ अकराव्या स्थानी राहील याची निश्चिती होऊ शकली नाही. (Indian Super League)

सामना वास्को (Vasco) येथील टिळक मैदानावर झाला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे स्पर्धेतील अखेरचा सामना खेळलेल्या नॉर्थईस्टचे 20 लढतीनंतर 14 गुण झाले व ते आता दहाव्या क्रमांकावर कायम आहेत. एक सामना बाकी असलेल्या ईस्ट बंगालचे 19 लढतीनंतर 11 गुण झाले, त्यामुळे त्यांच्या अकराव्या क्रमांकात फरक पडू शकला नाही. ईस्ट बंगालने शेवटच्या साखळी सामन्यात माजी विजेत्या बंगळूर (Bangalore) एफसीला हरविले. तर कोलकात्याचा (Kolkata) संघ नॉर्थईस्टला गाठू शकेल. पराभूत झाल्यास सलग दुसऱ्या मोसमात ईस्ट बंगाल अकराव्या क्रमांकावरच राहून मोहीम संपवेल.

Indian Super League
Indian Super League: केरळा ब्लास्टर्सचे आव्हान कायम

सोमवारी झालेल्या लढतीत 46व्या मिनिटास ऑस्ट्रियन मध्यरक्षक मार्को साहानेक याने रिबाऊंडवर चेंडूला योग्य दिशा दाखविणारा फटका मारल्यामुळे नॉर्थईस्टला आघाडी मिळाली. मात्र 55व्या मिनिटास क्रोएशियन स्ट्रायकर अंतोनियो पेरोसेविच याने पेनल्टी फटक्यावर अचूक नेम साधल्यामुळे ईस्ट बंगालला बरोबरी साधता आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
India Wins By 124 Runs in Asian Games
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com