Zaheer Khan | James Anderson X/BCCI and ICC
क्रीडा

James Anderson: 'झहीरला पाहून शिकलो...', अँडरसनचा खुलासा; बुमराहवरही केला कौतुकाचा वर्षाव, वाचा काय म्हणाला

James Anderson: इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने झहीर खानकडून शिकायला मिळाल्याचे सांगताना सध्याच्या भारतीय गोलंदाजांचेही भरभरून कौतुक केले.

Pranali Kodre

James Anderson said he learned few skill including reverse swing from Zaheer Khan

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील अखेरचा सामना धरमशाला येथे 7 मार्चपासून सुरू होणार आहे. या सामन्यात खेळल्यास इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनला 700 कसोटी विकेट्स घेण्याची संधी मिळणार आहे.

41 वर्षीय अँडरसनला 700 विकेट्ससाठी अद्याप 2 विकेट्सची गरज आहे. दरम्यान, अँडरसनने हा सामना खेळण्यापूर्वी रिव्हर्स स्विंग आणि त्याच्या दिर्घकाळ खेळण्याबद्दल भाष्य केले आहे. यादरम्यान, त्याने असेही सांगितले की त्याने भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खानकडूनही गोलंदाजीतील काही पैलू शिकले आहेत.

जिओ सिनेमाशी बोलताना अँडरसन म्हणाला, 'माझ्यासाठी झहीर खान असा एक खेळाडू होता, ज्याला मी खूप पाहायचो. तो कसा रिव्हर्स स्विंग करतो, तो गोलंदाजी करताना चेंडू कसा लपवतो, या अशा गोष्टी आहेत, ज्या मी इथे त्याच्या विरुद्ध खेळताना विकसिक केल्या आहेत.'

झहीर खानने 2014 मध्ये निवृत्ती घेतली होती. दरम्यान, अनेक वर्षे झहीर आणि अँडरसन एकमेकांविरुद्ध खेळले आहेत.

अँडरसनने सध्या भारतीय संघात असलेल्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी यांच्या गोलंदाजीचेही कौतुक केले.

तो बुमराहच्या गोलंदाजीबद्दल बोलताना म्हणाला, 'बुमराहकडे जी गुणवत्ता आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्याकडून त्याच स्तराच्या गोलंदाजीची अपेक्षा करता. भारताच रिव्हर्स स्विंग मोठी भूमिका निभावू शकतो हे तुम्हाला माहित आहे आणि त्यात बुमराह माहिर आहे. त्याच्याकडे चांगली गती, अचूकता आणि सातत्य आहे.'

'ऑली पोप विरुद्ध त्याने टाकलेला यॉर्करही पाहिला, तर त्याच्याकडे याचेही कौशल्य आहे. तो जागतिक स्तरावर सध्या अव्वल आहे, हा काही योगायोग नाही. तो जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. आमच्या दृष्टीने सांगायचे झाले, तर त्याची कामगिरी पाहून आम्हाला आश्चर्य वाटले नाही.'

याबरोबर अन्य भारतीय गोलंदाजांचेही कौतुक करताना अँडरसन म्हणाला, 'बुमराह, शमी आणि सिराज यांच्यापेक्षा अधिक चांगले गोलंदाज फार नाहीत. ते जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. त्यात तुम्ही इशांत शर्मालाही सामील केले, तर त्यांचे गोलंदाजी आक्रमण खरोखर खूप भक्कम असेल.'

दरम्यान, अँडरसन गेल्या 22 वर्षांपासून सातत्याने कसोटी क्रिकेट खेळत आहे. सध्या इंग्लंड संघात असलेले शोएब बशीर आणि रेहान अहमद हे खेळाडू जेव्हा अँडरसनने पदार्पण केले होते तेव्हा जन्मलेही नव्हते.

याबद्दल तो म्हणाला, 'हो अशा गोष्टींची चर्चा होते, पण खरं सांगू का मी मला आणि माझ्या शरीराला जे वाटते, ते मी करतो. मला असं वाटत नाही की मी 41 वर्षे आणि 200 दिवसांचा आहे. मला अजूनही मी युवा वाटतो.'

'मी अजूनही युवा खेळाडूंप्रमाणेच ट्रेनिंग करतो. मी अजूनही मला हव्या त्या वेगाने गोलंदाजी करू शकतो. मी अजूनही मला हव्या त्या कौशल्यासह गोलंदाजी करू शकतो. मला वाटतं की हेच सर्वात महत्त्वाचं आहे. वय फक्त आकडा आहे, माझ्यासाठी हे खूपच असंबद्ध आहे.

दरम्यान टी20 क्रिकेटमुळे रिव्हर्स स्विंग लुप्त होत असल्याची चर्चा होत असते. याबद्दल अँडरसन म्हणाला, 'मला वाटत नाही की ती लुप्त होत आहे. मर्यादीत षटकांचे क्रिकेट नजीकच्या काळात वाढल्याने कदाचीत गतीमध्ये बदल किंवा यॉर्करसारख्या गोलंदाजी शैलीकडे फोकस वाढला आहे. पण माझ्यासाठी कसोटी क्रिकेटच आहे. आपण या संपूर्ण कसोटी मालिकेत पाहिले की स्विंग किती मोठी भूमिका बजाबू शकते.'

'बुमराहने ज्याप्रकारे गोलंदाजी केली, ते पाहणे शानदार होते. दुसऱ्या कसोटीत त्याने केलेली रिव्हर्स स्विंग गोलंदाजी, ही सर्वोत्तम होती. मला वाटतं की अजूनही असे खेळाडू आहेत, ज्यांना ही कला शिकायची आहे आणि ती कला सोपी नाही.'

याशिवाय या मालिकेत विराटविरुद्ध खेळायला मिळाले नसल्याने वाईट वाटल्याचे अँडरसन म्हणाला. त्याचबरोबर तो म्हणाला त्यांच्यात यापूर्वी अनेकदा चांगली स्पर्धा झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT