Ishan Kishan & Shubman Gill  Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND 3rd ODI: इशान किशन आणि शुभमन गिल जोडीचा मोठा कारनामा, गब्बर-रहाणेचा मोडला रेकॉर्ड!

WI vs IND 3rd ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिल आणि इशान किशन या जोडीने विशेष कामगिरी केली.

Manish Jadhav

WI vs IND 3rd ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिल आणि इशान किशन या जोडीने विशेष कामगिरी केली. या भारतीय जोडीने वेस्ट इंडिजमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी केली.

या दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात पहिल्या विकेटसाठी 143 धावांची भागीदारी केली. विशेष म्हणजे, इशान किशन आणि शुभमन गिल जोडीने शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी 2017 मध्ये केलेला विक्रम मोडला.

दरम्यान, शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि अजिंक्य रहाणे या जोडीने 2017 मध्ये त्रिनिदादमधील क्वीन्स पार्क ओव्हलमध्ये पहिल्या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी केली होती.

मात्र, इशान किशन आणि शुभमन गिल या जोडीने त्यांचा विक्रम मोडीत काढला. सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी 2007 च्या विश्वचषकात पोर्ट ऑफ स्पेन येथे बर्म्युडाविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी 202 धावांची भागीदारी केली होती.

दुसरीकडे, इशान आणि शुभमन यांनी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 90 धावांची भागीदारी केली होती. मात्र ही जोडी पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर भारतीय संघाची फरफट झाली. मात्र, तिसऱ्या वनडेत या जोडीने अप्रतिम कामगिरी केली.

इशान किशनने 43 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे त्याचे वनडेतील सलग तिसरे अर्धशतक आहे. मात्र, यावेळी त्याला आपल्या दमदार सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही आणि 64 चेंडूत 77 धावा करुन तो बाद झाला.

तसेच, इशान किशननंतर शुभमन गिलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. गिलने 51 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी 80 चेंडूत 100 धावांची भागीदारी पूर्ण केली होती. इशान बाद झाल्यानंतर गिलसह संजूने तूफान फटकेबाजी केली. संजूही अर्धशतक पूर्ण करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT