Arlene Kelly international retirement Dainik Gomantak
क्रीडा

Cricketer Retirement: 110 सामने, 136 विकेट्स अन् वयाच्या 32व्या वर्षी निवृत्ती; स्टार क्रिकेटपटूचा धक्कादायक निर्णय

Arlene Kelly international retirement: आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाची अनुभवी अष्टपैलू खेळाडू अर्लीन केली हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाची अनुभवी अष्टपैलू खेळाडू अर्लीन केली हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अवघ्या 32व्या वर्षी तिने क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांसह क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त होत आहे. अवघ्या चार वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिने आयर्लंडसाठी 110 सामने खेळले आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर 136 विकेट्स मिळवल्या.

इंग्लंडविरुद्धचा सामना ठरला अखेरचा

अर्लीन केलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्याने झाला. 6 सप्टेंबर रोजी झालेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने आयर्लंडवर तब्बल 114 धावांनी विजय मिळवला. हा सामना अर्लीनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरला. 2022 मध्ये पदार्पण केल्यानंतर तिने कमी कालावधीत आयर्लंडच्या संघात महत्त्वाचे स्थान निर्माण केले होते.

न्यूझीलंडमध्ये जन्म, आयर्लंडमधून क्रिकेटची नवी सुरुवात

अर्लीन नोरा केलीचा जन्म न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे 1994 मध्ये झाला. 2022 मध्ये तिने न्यूझीलंड सोडून आयर्लंडमध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मलाहाइड क्रिकेट क्लबकडून खेळताना तिच्या कामगिरीने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर जून 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली.

चार वर्षांतच मोठा ठसा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर अर्लीनने सातत्यपूर्ण कामगिरी करत संघातील आपले स्थान मजबूत केले. 110 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिच्या नावावर 136 विकेट्स आहेत. 2025 मध्ये तिला आयर्लंडच्या महिला संघाचे नेतृत्व करण्याची संधीही मिळाली. आयर्लंडच्या महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिचा समावेश होतो.

वनडेपेक्षा टी-20मध्ये गोलंदाजीचा प्रभाव अधिक

अर्लीनच्या वनडे कारकिर्दीचा विचार केला तर तिने 39 सामने खेळताना 45 विकेट्स घेतल्या. यामध्ये दोन वेळा तिने एका डावात चार विकेट्स घेण्याची कामगिरी केली. फलंदाज म्हणूनही तिने संघासाठी 424 धावा केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिची कामगिरी आणखी प्रभावी ठरली. 71 सामन्यांत तिने तब्बल 91 विकेट्स घेतल्या. मात्र, फलंदाज म्हणून तिचे योगदान तुलनेने मर्यादित राहिले.

इंग्लंडने आयर्लंडचा केला 3-0 असा पराभव

अर्लीनच्या निवृत्तीच्या घोषणेसोबतच आयर्लंडच्या इंग्लंड दौऱ्याचीही निराशाजनक सांगता झाली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने आयर्लंडचा सहा विकेट्सने पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडने सहा विकेट्स राखून विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने 114 धावांनी मोठा विजय मिळवत मालिका 3-0 अशी खिशात घातली. त्यामुळे अर्लीनच्या शेवटच्या सामन्यात आयर्लंडला विजय मिळवता आला नाही.

कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अर्लीन न्यूझीलंडमध्ये आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत अधिक वेळ घालवण्याच्या विचारात असल्याचे सांगितले जात आहे. चार वर्षांच्या छोट्या पण प्रभावी आंतरराष्ट्रीय प्रवासानंतर तिने क्रिकेटमधून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. आयर्लंडच्या महिला क्रिकेटसाठी तिची गोलंदाजी आणि संघातील योगदान निश्चितच लक्षात राहणारे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: चाकू हल्ल्याच्या दोन घटनांनी खळबळ! 'जीआयएम'च्या विद्यार्थिनीवर हल्ला; दुसरीकडे आमदाराच्या भावाला भोसकले

Goa Politics: आघाडीसंदर्भात काँग्रेस-आरजीपी यांच्यातील चर्चेची पहिली फेरी पूर्ण; आप, गोवा फॉरवर्ड, गोवा काँग्रेस पक्ष एकत्र येण्याचे संकेत

नव्या फौजदारी कायद्यांची गोव्यात 'धार'! गुन्हे सिद्धतेचा दर 22 वरून 53.2 टक्क्यांवर; गृहमंत्री अमित शहांकडून कौतुक

VIDEO: रनवे ओलांडून ॲमेझॉनचं बोईंग-767 विमान थेट गाड्यांवर धडकलं; भीषण स्फोटात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 250 फ्लाइट्सवर परिणाम

Horoscope: अजा एकादशीला जुळून आला अत्यंत शुभ योग! 'या' राशींचे नशीब चमकणार, पैशांची चणचण मिटून करिअरमध्ये येणार मोठी भरारी

SCROLL FOR NEXT