Goa Politics: आघाडीसंदर्भात काँग्रेस-आरजीपी यांच्यातील चर्चेची पहिली फेरी पूर्ण; आप, गोवा फॉरवर्ड, गोवा काँग्रेस पक्ष एकत्र येण्याचे संकेत

Congress RGP alliance Goa: येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षात (आरजीपी) आघाडी होण्याचे निश्चित झाले.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षात (आरजीपी) आघाडी होण्याचे निश्चित झाले असून त्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व ‘आरजीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश बोरकर यांच्यात चर्चेची प्राथमिक फेरी पूर्ण झाली आहे.

दुसरीकडे काँग्रेस आघाडीत येण्यास तयार नसेल तर आप, गोवा फॉरवर्ड, काँग्रेसमधील फुटीर गट आणि नव्याने स्थापन झालेला गोवा काँग्रेस पक्ष एकत्र येऊ शकतात, असे वक्तव्य ‘आप’चे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

"विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत माझी शनिवारी गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासोबत प्राथमिक बैठक झाली. काँग्रेससोबत आघाडीची चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष अमोल नावेलकरही या बैठकीला उपस्थित होते. आघाडीनंतरच्या किमान समान कार्यक्रमाबाबत आमची चर्चा झाली.

त्याबाबत तसेच निवडणुकीत कोणकोणते मतदारसंघ मागायचे, यासंदर्भात मी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी सविस्तर चर्चा करणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात काँग्रेस आणि आरजीपीच्या समित्यांमध्ये चर्चा होऊन आघाडीसंदर्भातील बोलणी पुढे जाईल" असे वीरेश बोरकर यांनी ‘गोमन्तक’शी संवाद साधताना सांगितले.

‘‘आप आणि गोवा फॉरवर्डसंदर्भात मी गिरीश चोडणकर यांना विचारले, तेव्हा त्यांनी ‘आप’ आणि गोवा फॉरवर्डसोबतही चर्चा करणार असल्याचे सांगितले. ते दोन्ही पक्ष आघाडीत येण्यास तयार असतील तर त्यांनाही सोबत घेण्यास काँग्रेस तयार आहे. पण शेवटी विषय त्या दोन्ही पक्षांचा असेल, असेही चोडणकर यांनी सांगितले", असे बोरकर यांनी स्पष्ट केले.

Goa Politics
Migrants in Goa: गोव्यात 90 टक्के गुन्ह्यांसाठी परप्रांतीय जबाबदार? कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अभ्यासात नेमकं काय समोर आलं?

"नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात आम्ही सर्व विरोधकांनी मिळून सरकारला संघटितरित्या धारेवर धरले. आघाडीबाबत ‘आप’ने स्थापन केलेली समिती इतर पक्षांसोबत चर्चा करीत आहे. त्यामुळे मी त्यात लक्ष घातलेले नाही. अधिवेशन काळात युरी, एल्टन यांच्याशी माझी आघाडीबाबत वैयक्तिक चर्चा झाली होती. त्यांनाही निवडणुकीत आघाडी हवी आहे; पण काँग्रेसचे अजून काही निश्चित दिसत नाही. अशा स्थितीत काँग्रेसने विलंब केला तर ‘आप’, गोवा फॉरवर्ड आणि गोवा काँग्रेस पक्ष एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असे आमदार व्हेंझी व्हिएगस म्हणाले.

अधिकाधिक जागा मिळविण्याचे प्रयत्न

विधानसभा निवडणुकीत आघाडीबाबत आप आणि गोवा फॉरवर्ड यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे गिरीश चोडणकर म्हणत असले, तरीही गिरीश केवळ ‘आरजीपी’लाच सोबत घेऊन पुढे जाण्याचा विचार करत आहे. कारण सद्यस्थितीत भाजप सरकार विरोधात गोमंतकीयांत पसरलेला रोष पाहता अधिकाधिक जागा लढवून तेथे विजय मिळविण्याचा त्यांचा निर्धार आहे. वीरेश बोरकरही किमान १०-१५ जागा पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहेत, असे दोन्ही पक्षांतील सूत्रांनी सांगितले.

Goa Politics
Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

आघाडीनंतरच्या किमान समान कार्यक्रमाबाबत आमची चर्चा झाली. त्याबाबत तसेच निवडणुकीत कोणकोणते मतदारसंघ मागायचे, यासंदर्भात मी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी सविस्तर चर्चा करणार आहे.

- वीरेश बोरकर, आमदार, रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com