India vs Ireland: टीम इंडियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी आयर्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. आयर्लंडने 15 जणांचा संघ जाहीर केला. संघाचे नेतृत्व पॉल स्टर्लिंग करणार आहे. तर टीम इंडियाने आधीच आपल्या संघाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणार आहे, तर ऋतुराज गायकवाडवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पॉल स्टर्लिंग (सी), अँड्र्यू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्पर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वूरकोम, बेन व्हाइट, क्रेग यंग.
भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे. जी 18 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तर दुसरा सामना 20 ऑगस्ट रोजी आणि तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. भारताने आयर्लंड दौऱ्यासाठी संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. तर युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना टी-20 मालिकेतही संधी मिळाली आहे.
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.