India vs Ireland: आयर्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, जसप्रीत बुमराह 'कर्णधार'!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने सोमवार, 31 जुलै रोजी आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
Jasprit Bumrah
Jasprit BumrahDainik Gomantak
Published on
Updated on

Team India oFr Ireland T20Is: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने सोमवार, 31 जुलै रोजी आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघाचे कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आले आहे.

बुमराह जवळपास 10 महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन करत आहे. विशेष म्हणजे, पुनरागमन करताच त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

बुमराह सप्टेंबर 2022 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. पाठीच्या सततच्या दुखापतीमुळे हैराण झालेला बुमराह आता शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करत आहे. आयर्लंडविरुद्धची ही मालिका त्याच्या आशिया चषक आणि विश्वचषकाचे भवितव्य ठरवेल.

दरम्यान, बुमराहशिवाय ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे, जो आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा, शिवम दुबे, शाहबाज अहमद या युवा खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे.

Jasprit Bumrah
Team India: बुमराह, पंतसह 5 खेळाडूंचे BCCI ने दिले मेडिकल अपडेट्स, जाणून घ्या कोणाची काय स्थिती

दुसरीकडे, जसप्रीत बुमराहसोबतच (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे मैदानाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाही आयर्लंडविरुद्ध संघात पुनरागमन करणार आहे. बुमराह आणि कृष्णा यांनी एनसीएमध्ये खूप सराव केला.

15 खेळाडूंच्या या भारतीय संघात जसप्रीत बुमराहसह 5 वेगवान गोलंदाज आहेत, तर वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद आणि रवी बिश्नोई या तीन फिरकीपटूंना या संघात स्थान मिळाले आहे.

Jasprit Bumrah
India Women Cricket Team: बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, स्टार खेळाडूंना वगळले

आयर्लंड टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ - जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

आयर्लंड विरुद्ध भारत टी20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना - 18 ऑगस्ट, मालाहाइड

दुसरा सामना - 20 ऑगस्ट, मालाहाइड

तिसरा सामना - 23 ऑगस्ट, मालाहाइड

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com