IPL 2026 Schedule Dainik Gomantak
क्रीडा

क्रिकेट प्रेमींसाठी मोठी बातमी! 28 मार्चपासून रंगणार आयपीएल 2026 चा महासंग्राम; चौकार-षटकारांची होणार तूफानी आतिषबाजी

IPL 2026 Schedule: इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या हंगामाच्या सुरुवातीच्या तारखेमध्ये बीसीसीआयने बदल केला असून आता हा भव्य सोहळा 28 मार्च 2026 पासून सुरु होणार आहे.

Manish Jadhav

IPL 2026 Schedule: क्रिकेट प्रेमींसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली. इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या हंगामाच्या सुरुवातीच्या तारखेमध्ये बीसीसीआयने बदल केला असून आता हा भव्य सोहळा 28 मार्च 2026 पासून सुरु होणार आहे. यापूर्वी हा प्रतिष्ठित टूर्नामेंट 26 मार्चपासून सुरु होणार असल्याचे संकेत होते, मात्र देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक लक्षात घेता आयोजकांनी दोन दिवसांचा उशीर करण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये निवडणुका होणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव आणि नियोजनाच्या दृष्टीने हा बदल करण्यात आला.

आयपीएलच्या (IPL) संपूर्ण वेळापत्रकाच्या घोषणेला उशीर होत असल्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र त्यामागील मुख्य कारण आता स्पष्ट झाले. ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यापैकी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आसाम या तीन राज्यांमध्ये आयपीएलचे महत्त्वाचे सामने खेळवले जाणार आहेत. कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स हे कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) होम ग्राऊंड आहे, तर चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियम हे चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) बालेकिल्ला मानले जाते. याशिवाय, गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्सचे दुसरे महत्त्वाचे वेन्यू आहे. या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर न झाल्यामुळे बीसीसीआयला संपूर्ण वेळापत्रक निश्चित करण्यात अडचणी येत आहेत.

प्रसारणकर्त्यांनी (Broadcasters) आगामी स्पर्धेच्या सुरुवातीची तारीख जाहीर केली असली तरी, संपूर्ण 74 सामन्यांचे वेळापत्रक अद्याप गुलदस्त्यात आहे. निवडणूक आयोगाकडून तारखांची घोषणा होताच, आयपीएलचे वेळापत्रकही जाहीर केले जाईल, असे सूत्रांकडून समजते. विशेषतः ज्या दिवशी मतदान असेल, त्या दिवशी त्या शहरात सामने टाळण्याचा प्रयत्न बीसीसीआय (BCCI) करणार आहे. खेळाडूंची सुरक्षा आणि प्रेक्षकांची गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांवरील ताण कमी करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. निवडणुकांमुळे आयपीएलमध्ये अशा प्रकारचे बदल होण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अनेकदा निवडणुकांच्या तारखांनुसार आयपीएलचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

येत्या काही दिवसांत निवडणूक आयोगाकडून पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम स्पष्ट होईल आणि त्यानंतर तत्काळ बीसीसीआय अधिकृतपणे आयपीएल 2026 चे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध करेल. यंदाच्या हंगामात अनेक नवीन बदल पाहायला मिळणार असून, सुरुवातीची तारीख बदलल्यामुळे आता 28 मार्च रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गतविजेता संघ आणि उपविजेता संघ यांच्यातच सलामीचा सामना रंगण्याची परंपरा यंदाही कायम राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT