Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Scripted Bike Theft Video: सध्या इंटरनेटवर असाच एक अतरंगी व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून तो पाहून लोक विचार करत आहेत की, चोरी करण्यासाठी लोक काय काय नवनवीन क्लृप्त्या शोधून काढतात.
Viral Scripted Bike Theft Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Viral Scripted Bike Theft Video: सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे जिथे तुम्ही जितका वेळा घालवाल, तितका वेळा तुम्हाला काहीतरी वेगळे, अतरंगी आणि थक्क करणारे पाहायला मिळते. सध्या इंटरनेटवर (Internet) असाच एक अतरंगी व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून तो पाहून लोक विचार करत आहेत की, चोरी करण्यासाठी लोक काय काय नवनवीन क्लृप्त्या शोधून काढतात. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक अतिशय गंभीर आणि थरारक प्रसंग पाहायला मिळतो, मात्र व्हिडिओच्या शेवटी जे सत्य समोर येते ते पाहून युजर्संना हसावे की रडावे हेच समजत नाहीये.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक धक्कादायक दृश्य दिसते. एक व्यक्ती हातात काठी घेऊन जमिनीवर निष्प्राण पडलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीचा पाय पकडून त्याला फरफटत ओढत नेताना दिसत आहे. हे दृश्य पाहून कोणालाही वाटेल की, तिथे एखादा भीषण गुन्हा किंवा हाणामारी झाली आहे आणि तो माणूस त्या मृतदेहाची विल्हेवाट लावत आहे. तितक्यात तिथून एक दुचाकीस्वार जात असतो, तो हे भयानक दृश्य पाहून तिथेच थांबतो. तो थांबताच काठी घेतलेला माणूस थेट त्या बाईकस्वाराच्या दिशेने धावतो आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो बाईकस्वार आपली चालू दुचाकी तिथेच सोडून पळ काढतो.

Viral Scripted Bike Theft Video
Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा आक्रमक अवतार? भर मैदानात 'या' खेळाडूला मारली लाथ, कॅमेऱ्यामागे नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

खरा थरार आणि ट्विस्ट यानंतर पाहायला मिळतो. जसा तो दुचाकीस्वार तिथून पळून जातो, तसा तो जमिनीवर पडलेला माणूस अचानक जिवंत होऊन उठून उभा राहतो. तो दुसरा तिसरा कोणी नसून त्या काठीवाल्याचा साथीदारच असतो. दुचाकीस्वाराला घाबरवून त्याची दुचाकी चोरण्यासाठी या दोघांनी रचलेला हा एक बनाव असतो. यानंतर ते दोघेही ती दुचाकी घेऊन तिथून पसार होतात. हा व्हिडिओ पूर्णपणे प्री-प्लॅन्ड आणि स्क्रिप्टेड म्हणजेच दिग्दर्शित केलेला आहे, जो केवळ मनोरंजनासाठी बनवण्यात आला.

Viral Scripted Bike Theft Video
Viral Post: "हो, माझी गर्लफ्रेंड आहे, तिचं नाव...", वैभव सूर्यवंशी खरंच रिलेशनशिपमध्ये? पोस्ट होतेय व्हायरल, चाहते पडले संभ्रमात

हा व्हिडिओ 'एक्स'वर एका युजरने पोस्ट केला असून, "यांना असल्या भन्नाट आयडिया नक्की कोण देतं?" असे कॅप्शनमध्ये लिहिले. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर मजेशीर कमेंट्स येत आहेत. एका युजरने लिहिले की, "हा केवळ मनोरंजनाचा भाग वाटतोय", तर दुसऱ्या एकाने उपरोधाने लिहिले की, "या व्हिडिओने चोरांना नवीन आयडिया दिली आहे." तर एकाने "आपला देश खरोखरच एखाद्या कार्टूनसारखा अजब आहे" अशी गमतीशीर प्रतिक्रिया दिली. एकूणच या स्क्रिप्टेड चोरीच्या व्हिडिओने सध्या नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com