

IPL Mini Auction 2026: इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या लिलावाला अत्यंत नाट्यमय आणि ऐतिहासिक सुरुवात झाली. सर्व दहा संघ आपल्या 'विशलिस्ट'सह मैदानात उतरले असताना ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमेरुन ग्रीन याने लिलावाचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले. ग्रीनला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी दोन दिग्गज संघांमध्ये झालेल्या घमासानानंतर अखेर कोलकाता नाईट रायडर्सने त्याला विक्रमी किमतीत खरेदी केले.
कॅमेरुन ग्रीनचे नाव लिलावाच्या पहिल्याच सेटमध्ये होते. त्याची बेस प्राईज (मूळ किंमत) 2 कोटी रुपये होती. लिलाव सुरु होताच सर्वात पहिली बोली त्याच्या जुन्या संघाने म्हणजेच मुंबई इंडियन्सने लावली. त्यानंतर लगेचच राजस्थान रॉयल्सने शर्यतीत उडी घेतली. मात्र, बोलीचा आकडा 10 कोटींच्या पार जाताच मुंबई इंडियन्सकडे असलेल्या कमी बजेटमुळे त्यांना माघार घ्यावी लागली. राजस्थाननेही त्याला आपल्या संघात घेण्यासाठी लढत दिली, पण किंमत अवाढव्य वाढू लागल्याने त्यांनीही आपले पाऊल मागे घेतले.
खरी चुरस निर्माण झाली ती चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात रंगली. चेन्नईने थेट 13 कोटींपासून बोली लावत सर्वांना चकित केले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेला आपल्या संघात एका फिनिशर आणि वेगवान गोलंदाजाची गरज होती. मात्र, केकेआरने अजिबात हार मानली नाही. दोन्ही संघ एकमेकांवर मात करत 25 कोटींच्या आकड्यापर्यंत पोहोचले.
जेव्हा चेन्नईने 25 कोटींची सर्वाधिक बोली लावली, तेव्हा असे वाटले की ग्रीन आता 'यलो आर्मी'चा भाग होईल. मात्र, केकेआरने शेवटचा घाव घालत 25 कोटी 20 लाख रुपयांची बोली लावली. या अवाढव्य रकमेनंतर चेन्नईने माघार घेतली आणि कॅमेरुन ग्रीन अधिकृतरित्या केकेआरचा खेळाडू बनला.
25.20 कोटींच्या या रकमेसह कॅमेरून ग्रीन आता आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. त्याने मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांचे मागील विक्रम मोडीत काढले आहेत. लिलावाच्या मैदानात एखाद्या अष्टपैलू खेळाडूसाठी लागलेली ही आजवरची सर्वात मोठी बोली ठरली.
केकेआरने एका खेळाडूवर आपल्या पर्समधील मोठा हिस्सा खर्च केला असला तरी, ग्रीनसारखा मॅच-विनर खेळाडू त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर ग्रीनचा वेग आणि लांब षटकार मारण्याची क्षमता केकेआरला तिसरे जेतेपद मिळवून देण्यासाठी मोलाची ठरेल, अशी आशा चाहत्यांना आहे.
1. कॅमेरुन ग्रीन (Cameron Green)
2. जेमी स्मिथ (Jamie Smith)
3. लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone)
4. मथीशा पथिराना (Matheesha Pathirana)
4. रवी बिश्नोई (Ravi Bishnoi)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.