EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

How To Check EPFO Balance: सरकारने मंजूर केलेल्या 8.25 टक्के वार्षिक व्याजदराने हा निधी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा केला जात आहे. दरमहा हिशोब केल्यास हा व्याजदर सुमारे 0.688 टक्के इतका होतो.
EPFO how to check PF interest credit and account balance online
EPFO how to check PF interest credit and account balance onlineDainik Gomantak
Published on
Updated on

How To Check EPFO Balance: देशातील करोडो पगारदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांच्या खात्यात आर्थिक वर्ष 2025-26 चे वार्षिक व्याज जमा करण्याची प्रक्रिया अधिकृतरित्या सुरु केली. सरकारने मंजूर केलेल्या 8.25 टक्के वार्षिक व्याजदराने हा निधी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा केला जात आहे. दरमहा हिशोब केल्यास हा व्याजदर सुमारे 0.688 टक्के इतका होतो. पीएफच्या व्याजाची गणना दरमहा खात्यातील शिल्लक रकमेच्या आधारे केली जाते, मात्र सरकारकडून अधिसूचना जारी झाल्यानंतर हे व्याज वर्षातून एकदाच खात्यात जमा केले जाते.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओ सुमारे 34 कोटी खातेदारांच्या खात्यात 1.44 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्याजाची रक्कम वर्ग करत असून हा पैसा लोकांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे, ईपीएफओने आपला संपूर्ण डेटाबेस नवीन 'सेंट्रलाइज्ड आयटी इनेबल्ड सर्व्हिसेस' (CITES) प्रोजेक्ट अंतर्गत स्थलांतरित केल्यानंतर ही व्याजाची रक्कम दिली जात आहे. या सॉफ्टवेअर अपग्रेडेशनमुळे काही काळ ऑनलाइन सेवा विस्कळीत झाल्या होत्या, परंतु आता नवीन प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाली. सिस्टीम मायग्रेशनमुळे सुरुवातीच्या काळात पीएफ क्लेम आणि इतर ऑनलाइन सेवांच्या निपटाऱ्यात काहीसा उशीर होऊ शकतो, असे ईपीएफओने स्पष्ट केले.

EPFO how to check PF interest credit and account balance online
देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

तुमच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले आहेत की नाही, हे तुम्ही घरबसल्या सहज तपासू शकता. यासाठी ईपीएफओ मेंबर ई-सेवा पोर्टल, पासबुक लाईट पोर्टल आणि उमंग (UMANG) ॲप हे तीन पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्ही पासबुक पोर्टलचा वापर केला, तर तुम्हाला 12 अंकी यूएएन (UAN) नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगइन करावे लागेल. यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो प्रविष्ट केल्यानंतर तुम्ही 'पासबुक लाईट'च्या माध्यमातून जमा झालेली व्याजाची रक्कम पाहू शकाल. जर खात्यात व्याजाची रक्कम लगेच दिसली नाही, तरी घाबरण्याचे कारण नाही, कारण व्याजाची गणना आधीच झालेली असते आणि पासबुकमध्ये नोंद उशिरा झाली तरी व्याजाचे कोणतेही नुकसान होत नाही.

EPFO how to check PF interest credit and account balance online
3 वर्षांनी धमाका! PF वर मिळणार भरघोस परतावा, EPFO ​​ने वाढवला व्याजदर

ईपीएफ (EPFO) ही पगारदार वर्गासाठी निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा देणारी अत्यंत सुरक्षित आणि लोकप्रिय बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत कर्मचारी आणि कंपनी दोघेही मूळ वेतन आणि महागाई भत्त्याचा प्रत्येकी 12 टक्के हिस्सा पीएफ खात्यात जमा करतात, ज्याची किमान मर्यादा 1800 रुपये निश्चित आहे. एखादा कर्मचारी इच्छेनुसार या मर्यादेपेक्षा जास्त रक्कमही आपल्या पीएफ फंडात जमा करु शकतो, ज्यावर सरकारकडून करमुक्त आणि सुरक्षित परतावा मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com