IPL 2026 Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026: 10 संघ, 13 ठिकाणे, 70 साखळी सामने! आयपीएलचा धुमधडाका होणार सुरू; रॉयल चॅलेंजर्स, सनरायझर्स हैदराबाद भिडणार

IPL Opening Match: सूर्यकुमार यादवच्या संघाने टी-२० विश्वकरंडक जिंकल्यानंतर प्रतीक्षा असलेल्या आयपीएल स्पर्धेचा धुमधडाका सुरू होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

बंगळूर: सूर्यकुमार यादवच्या संघाने टी-२० विश्वकरंडक जिंकल्यानंतर प्रतीक्षा असलेल्या आयपीएल स्पर्धेचा धुमधडाका सुरू होत आहे. १० संघ, १३ ठिकाण, ७० साखळी सामने अशी मेजवानी आणि प्रत्येक सामन्यात रोमांचकारी थरार प्रेक्षकांना मिळणार आहे. गतविजेत्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या १९व्या मोसमाचा पडदा वर जाणार आहे.

जवळपास दोन महिने चौकार-षटकारांची बरसात पाहायला मिळणार आहे. २४ मेपर्यंत साखळी सामने होणार असून त्यानंतर प्लेऑफच्या लढती होतीत तोपर्यंत ७० सामने होणार आहेत.

टी-२० विश्वकरंडक स्पर्धा गाजवणारे संजू सॅमसन, ईशान किशन ते जसप्रीत बुमरापर्यंत सर्व खेळाडू एकमेकांविरुद्ध लढतील. अर्थात एकाबाजूला या विश्वविजेत्यांच्या कामगिरीची उत्सुकता असेल, त्याच वेळी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह ४४ वर्षीय महेंद्रसिंग धोनीच्याही कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

काही मोसम अगोदर जेवढे संघ तेवढीच ठिकाण असायची; परंतु आयपीएलचा थरार ज्या राज्यांचे संघ नाहीत त्यांनाही अनुभवण्यासाठी ठिकाणे वाढवण्यात आली, त्यामुळे १० संघ असले तरी १३ ठिकाणी सामने होणार आहेत.

गत स्पर्धा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या जल्लोषाच्या कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत ११ जणांचे जीव गेले होते. त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर देशांतर्गतही स्पर्धांचे सामने झाले नव्हते.

आता आयपीएलच्या निमित्ताने पुन्हा एकदा क्रिकेट या स्टेडियमवर परतणार आहे. चेंगराचेंगरीचे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी तब्बल सात कोटी खर्च करण्यात आले आहेत.

जीव गमावणाऱ्या प्रेक्षकांसाठी उद्या मनोरंजनाचा कोणताही उद्घाटन सोहळा होणार नाही. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असली तरी स्टेडियममध्ये उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांचा जल्लोष कसा असेल, याकडेही लक्ष असेल. सलामीच्या सामन्यातच विराट कोहली खेळणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणलेली आहे.

आयपीएल दृष्टिपथात

सर्वाधिक विजेतेपेद ः प्रत्येकी ५ ः मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज

सर्वाधिक सामने ः मुंबई इंडियन्स २७७

सर्वाधिक विजय ः मुंबई इंडियन्स १५३

सर्वाधिक धावसंख्या ः हैदराबाद २८७/३ वि. बंगळूर २०२४

सर्वाधिक मोठा विजय ः मुंबई इंडियन्स १४६ धावांनी वि. दिल्ली २०१७

सर्वाधिक षटकार ः मुंबई इंडियन्स १८२३

सर्वाधिक चौकार ः मुंबई इंडियन्स ३८९२

सर्वाधिक २००+ धावा ः चेन्नई ३५ वेळा

सर्वाधिक सलग विजय ः कोलकाता १० (२०१४-२०१५)

एकाच ठिकाणी सर्वाधिक विजय ः मुंबई इंडियन्स ५७ (वानखेडे)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT