IPL 2026 playoff predictions Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026: मुंबई इंडियन्स, हैदराबाद... 'या' 4 संघांचं 'प्लेऑफ'मधील स्थान पक्कं; दिग्गजांची मोठी भविष्यवाणी

IPL 2026 playoff predictions: जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या 'इंडियन प्रीमियर लीग'च्या (IPL) १९ व्या हंगामाचा थरार सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे.

Sameer Amunekar

जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या 'इंडियन प्रीमियर लीग'च्या (IPL) १९ व्या हंगामाचा थरार सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. यंदाचा हंगाम अनेक अर्थांनी खास ठरणार आहे, कारण इतिहासात पहिल्यांदाच सर्व १० संघांचे नेतृत्व भारतीय खेळाडूंकडे सोपवण्यात आले आहे. मैदानावरील लढत सुरू होण्यापूर्वीच मैदानाबाहेर 'भविष्यावाणीचा' खेळ रंगू लागला असून, दिग्गज क्रिकेट तज्ज्ञांनी प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या चार संभाव्य संघांची नावे जाहीर केली आहेत.

भारतीय नेतृत्वाचा नवा अध्याय

आयपीएल २०२६ चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सर्व दहा फ्रँचायझींचे कर्णधार भारतीय आहेत. यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. प्रत्येक संघाने लिलावातून आपली ताकद वाढवली असून सर्वच संघ विजेतेपदाचे दावेदार वाटत आहेत. मात्र, क्रिकेट विश्वातील जाणकारांच्या मते, काही संघ इतर संघांच्या तुलनेत अधिक संतुलित आणि प्रबळ दिसत आहेत.

इरफान पठाणची 'चौकडी' जाहीर

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने यंदाच्या हंगामासाठी आपले चार आवडते संघ निवडले आहेत. इरफानच्या मते, रोहित शर्माचा अनुभव आणि हार्दिक पांड्याची आक्रमकता असलेला मुंबई इंडियन्स, सातत्य शोधणारा पंजाब किंग्स, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स आणि संतुलित खेळाडूंची फौज असलेला राजस्थान रॉयल्स हे चार संघ प्लेऑफमध्ये आपली जागा निश्चित करतील. इरफानने प्रस्थापित संघांसोबतच पंजाब आणि दिल्लीसारख्या संघांवरही विश्वास दाखवला आहे.

हरभजन सिंगची संभ्रमावस्था आणि 'हैदराबाद'चे पुनरागमन

दुसरीकडे, भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंह याने तीन संघांची नावे ठामपणे सांगितली आहेत. भज्जीच्या मते, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील आक्रमक सनरायझर्स हैदराबाद हे संघ बाद फेरीत सहज प्रवेश करतील.

मात्र, चौथ्या स्थानासाठी त्याने कोणतीही स्पष्ट निवड न करता, हा निर्णय चाहत्यांवर सोपवला आहे. हरभजनच्या मते, चौथ्या जागेसाठी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चुरस पाहायला मिळू शकते.

चाहत्यांची धाकधूक वाढली

तज्ज्ञांच्या या भविष्यवाणीमुळे सोशल मीडियावर क्रिकेट प्रेमींमध्ये चर्चेला उधाण आले आहे. गतविजेते आणि पारंपरिक दिग्गज संघांना काही तज्ज्ञांनी डावलल्यामुळे चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. आता प्रत्यक्षात मैदानात कोण बाजी मारणार आणि कोणाची भविष्यवाणी खरी ठरणार, हे पाहण्यासाठी अवघा देश सज्ज झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT