Goa Crime: आई शॉपिंगमध्ये व्यस्त, अन् तिथेच नराधमाने साधली संधी; मडगावात दोन चिमुरड्यांचा लैंगिक छळ, फोंड्यातील एकाला अटक

Ponda man arrested Fatorda: दक्षिण गोव्यातील मडगाव-बोर्डा येथील एका नामांकित स्टोअरcध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दक्षिण गोव्यातील मडगाव-बोर्डा येथील एका नामांकित स्टोअरमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फतोर्डा पोलिसांनी तातडीने पावले उचलत फोंडा येथील टिव्हर्सिओ मॉन्टेरो या संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पीडित ५ आणि ७ वर्षांच्या दोन मुली आपल्या आईसोबत बोरडा येथील एका प्रसिद्ध स्टोअरमध्ये गेल्या होत्या. आई खरेदीमध्ये व्यस्त असताना संशयित आरोपी टिव्हर्सिओ याने संधी साधून या चिमुरड्यांचा लैंगिक छळ केला.

संशयिताने केलेले कृत्य पीडित मुलींनी आपल्या आईला सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार उजेडात आला. आपल्या पोटच्या गोळ्यांसोबत घडलेला हा संतापजनक प्रकार पाहून आईने विलंब न करता फातोर्डा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.

Goa Crime
Goa Crime: 'मोपा'वर मोठी कारवाई! 8 कोटींचे अमली पदार्थ जप्त; बँकॉक, अबूधाबीतून आलेल्या 5 प्रवाशांना अटक

गुन्हा दाखल

मुलींच्या आईने दिलेल्या तक्रारीची गांभीर्यपूर्वक दखल घेत फातोर्डा पोलिसांनी आरोपी टिव्हर्सिओ मॉन्टेरो याला तात्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयिताविरुद्ध 'पोक्सो' (POCSO Act), गोवा बाल हक्क कायदा (Goa Children’s Act) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असलेल्या या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्तरावर केला जात आहे.

Goa Crime
Goa Weather Update: अंगाची लाही-लाही! वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण; तापमानाची पस्तीशीपार

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

भरदिवसा आणि गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी अशा घटना घडत असल्याने मडगाव परिसरात खळबळ माजली आहे. नामांकित स्टोअर्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक असतानाही असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी मुलांवर लक्ष ठेवावे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com