Sanju Samson Dainik Gomantak
क्रीडा

Sanju Samson: बॅटिंगमध्ये नाही पण यष्टीरक्षणात सॅमसन चमकला, एका हातानेच पकडला पृथ्वी शॉचा सुरेख कॅच

Video: संजू सॅमसनने आयपीएल 2023 स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात पृथ्वी शॉ याचा एका हाताने अफलातून कॅच पकडला.

Pranali Kodre

Sanju Samson Catch: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील 11 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने 57 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन या सामन्यात त्याच्या फलंदाजीमुळे नाही, तर त्याच्या एका झेलामुळे चांगलाच चर्चेत आला होता.

या सामन्यात दिल्लीसमोर राजस्थानने 200 धावांचे आव्हान ठेवले होते. पण दिल्लीसाठी आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्याच षटकात पृथ्वी शॉ आणि मनिष पांडे यांच्या विकेट्स ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात लागोपाठच्या चेंडूवर घेतल्या. यातील शॉ याचा झेल यष्टीमागे सॅमसनने अप्रतिमरित्या घेतला.

बोल्टने टाकलेल्या डावातील तिसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉने क्रॉस बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याकडून फटका मारण्यात चूक झाली आणि चेंडू त्याच्या बॅटची कड घेत मागे गेला. यावेळी यष्टीरक्षण करत असलेल्या सॅमसनने लगेचच उजव्या बाजूला सूर मारत एका हाताने सुरेख झेल घेतला.

त्याच्या या झेलाचा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील शेअर करण्यात आला आहे. दरम्यान शॉ आणि पांडे यांना धावांचे खातेही उघडता आले नाही. तसेच त्यानंतर दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली. पण त्याला रिली रोसौ आणि ललित यादव व्यतिरिक्त कोणाकडूनही चांगली साथ मिळाली नाही. रोसौ देखील 14 धावा करून बाद झाला.

पण ललित आणि वॉर्नर यांनी 64 धावांची भागीदारी चौथ्या विकेटसाठी केली होती. पण 13 व्या षटकात बोल्टनेच ललितला 38 धावांवर त्रिफळाचीत केले आणि ही जोडीही फोडली. त्यानंतर मात्र दिल्लीने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. वॉर्नरही 55 चेंडूत 7 चौकारांसह 65 धावा करून बाद झाला. अखेर दिल्लीला 20 षटकात 9 बाद 142 धावाच करता आल्या.

राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विनने 2 विकेट्स घेतल्या, तर संदीप शर्माने 1 विकेट घेतली. 

तत्पूर्वी, राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी खेळी केली. जयस्वालने 31 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 60 धावा केल्या. तसेच बटलरने 51 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकारासह 79 धावा केल्या.

या दोघांव्यतिरिक्त हेटमायरनेही चांगला खेळ करताना 21 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. मात्र सॅमसन या सामन्यात शुन्यावर बाद झाला होता. पण जयस्वाल आणि बटलर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानने 20 षटकात 4 बाद 199 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

SCROLL FOR NEXT